रेल्वेच्या मध्य आणि ट्रान्सहार्बरवर रविवारी मेगाब्लॉक ; हे आहेत बदल
रविवारी (२८ ऑक्टोबर) मध्य आणि ट्रान्सहार्बर रेल्वेमार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
रविवारी (28 ऑक्टोबर) मध्य आणि ट्रान्सहार्बर रेल्वेमार्गांवर मेगाब्लॉक जाहिर करण्यात आला आहे. त्यामुळे सकाळी 11.15 ते दुपारी 3.45 पर्यंत दुरुस्तीची कामे चालणार आहेत. तर पश्चिम आणि हार्बर रेल्वेमार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार नाही. पण पश्चिम रेल्वेमार्गावर वसई ते पालघर दरम्यान शनिवारी रात्री 11.50 ते पहाटे 2.50 पर्यंत मेगाब्लॉक चालेल.
ट्रान्सहार्बरवर
ट्रान्सहार्बर मार्गावर ठाणे आणि वाशी/नेरुळ मार्गावर सकाळी 11.10 ते दुपारी 3.40 पर्यंत ब्लॉक चालेल. तर ठाणे वाशी दरम्यान स. 10.35 ते दु. 4.07 पर्यंत मेगाब्लॉक असेल. वाशीहून ठाण्याकडे जाणारी रेल्वेसेवा स. 10.45 ते दु.3.38 पर्यंत बंद राहिल.
पश्चिम रेल्वे
रविवारी वसई ते वैतरणादरम्यान रा. 11.50 ते पहाटे 2.50 पर्यंत मेगाब्लॉक असेल. त्यामुळे मेल, एक्स्प्रेस उशिराने धावतील.
करण्यात आलेले बदल
रविवारी मध्यरेल्वेच्या मुलुंड ते माटुंगा अप जलद मार्गावर सकाळी 11.15 ते दुपारी 3.45 पर्यंत मेगाब्लॉक चालेल. कल्याणहून सुटणाऱ्या सर्व जलद लोकल्स स. 10.37 ते दु. 3.06 पर्यंत दिवा ते परळपर्यंत धीम्या मार्गवारुन चालवण्यात येतील. त्यापुढे या लोकल्स पुन्हा परळपासून जलद मार्गावर चालवल्या जातील.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून सुटणाऱ्या सर्व जलद, अर्धजलद लोकल्स स. 10.05 ते दु. 3.22 पर्यंत घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड, दिवा स्थानकांत थांबतील. मेगाब्लॉक दरम्यान या लोकल्स सुमारे 20 मिनिटे उशिराने धावतील.
तसंच ठाण्याहून सीएसएमटी आणि दादरसाठी जाणाऱ्या सर्व मेल, एक्स्प्रेस स. 10.50 नंतर मुलुंड आणि माटुंगामध्ये अप धीम्या मार्गावर चालतील. त्यामुळे या गाड्याही सुमारे 20 मिनिटे उशिरा असतील.
रत्नागिरी दादर पॅसेंजर ही गाडी रविवारी दिव्याहूनच सुटेल. त्यामुळे मध्यरेल्वेने दादर ते दिव्यादरम्यान दु. 3.40 वाजता विशेष लोकल सोडली आहे. ही लोकल ठाणे ते दिवा स्थानकांत थांबेल.