Measles Outbreak in Mumbai: मुंबईत गोवरमुळे एकाचा मृत्यू,रुग्णसंख्या शंभर पार! केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून विशेष सुचना जारी

तर काही संशयित रुग्ण ही शहरात आढळले आहेत.

PC- wikimedia commons

मुंबई (Mumbai) शहरात गोवरचा (Measles) उद्रेक झाला हे असं म्हणायला हरकत नाही कारण दर दिवशी रुग्णसंख्येत मोठी वाढ होत आहे. मुंबईतील गोवर (Measles) रुग्णांची एकुण रुग्णसंख्या 126 वर पोहोचली आहे. तर एका बालकाचा गोवरची लागण होवून मृत्यू झाला आहे. चिमुकल्यांनमध्ये पसरणारा हा आजार शहरात चिंताग्रस्त वातावरण निर्माण करणारा आहे. प्रकृती गंभीर असल्यान 61 मुलांना कस्तुरबा रुग्णालयात (Kasturba Hospital) दाखल करण्यात आले असुन त्यापैकी सहा बालकांना व्हेंटिलेटरवर (Ventilator) ठेवण्यात आले आहे. तरी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून (Central Health Ministry) या साथिची विशेष नोंद घेण्यात आली सुन काही प्रतिबंधात्मक सुचना जारी करण्यात आल्या आहेत. गोवर हा लहान मुलांसाठी अत्यंत धोकादायक संसर्गजन्य आजार आहे. गोवर टाळण्याचा एकमेव मार्ग म्हणजे लसीकरण (Measles Vaccination) करणे. मुलांना गोवरपासून वाचवण्यासाठी त्यांना गोवर लसीचे 2 शॉट दिले जातात. गोवर आजाराचा उद्रेक झाल्यानंतर मुंबई महानगरपालिकेने (BMC) आता गोवरप्रतिबंधक मोहीम सुरू केली आहे.

 

शहरातील  गोवंडी (Gowandi) परिसरात गोवरचे सर्वात जास्त रुग्ण आढळून आले आहेत. तरी पालकांनी आपल्या पाल्यांची आवश्यक ती काळची घेणे अत्यंत महत्वाचे आहे. गोवर या जारावर कुठल्याही प्रकारचं औषध उपलब्ध नसल्याने नागरिकांमध्ये भितीचं वातावरण आहे. तरी काळजी घेणं हा एकमेव रामबाण , उपाय आहे. अंगात ताप भरणे, डोळ्यातून पाणी वाहणे, अंगावर पुरळ येणे यासारखी लक्षण आढळल्यास लगेच रुग्णालयात दाखल करण्याचं आवहान प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. (हे ही वाचा:- Measles In Mumbai: मुंबईकरांच्या चिंतेत भर! शहरात अचानक पसरला गोवर, जाणून घ्या लक्षणं)

Watch Video

गोवर लसीकरण (Measles Vaccination) सध्या प्रशासनाकडून सुरु करण्यात आले आहे. तुम्ही तुमच्या पाल्यास गोवरची लस न दिली असल्यास आजचं द्या. कारण गोवरवर सध्या तरी तोचं प्रतिबंधात्मक उपाय उपलब्ध आहे. तसेच आपल्या पाल्यास गर्दीच्या ठिकाणी किंवा लागण झालेल्या रुग्णाच्या संपर्कात येणं टाळावे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif