मातोश्री बाहेरील कोरोनाबाधित चहा विक्रेत्याच्या बिल्डिंग मधील चार जण Qurantine; वांद्रे कलानगर परिसरात कडक बंदोबस्त
आज या चहा विक्रेत्याच्या बिल्डिंग मधील सुद्धा अन्य चार ज्यांना क्वारंटाईन (Qurantine) मध्ये ठेवण्यात आल्याचे समजत आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या वांद्रे (Bandra) कलानगर (Kalanagar) येथील रहिवासाच्या म्हणजेच मातोश्री (Matoshree) बंगल्याच्या जवळच असणाऱ्या एका चहा विक्रेत्याला कोरोनाची (Coronavirus) लागण झाल्याचे माहिती काल मुंबई महापालिकेच्या (BMC) वतीने देण्यात आली. आज या चहा विक्रेत्याच्या बिल्डिंग मधील सुद्धा अन्य चार ज्यांना क्वारंटाईन (Qurantine) मध्ये ठेवण्यात आल्याचे समजत आहे. मुख्यमंत्र्यांच्या दारातच कोरोनाची बाधा आल्याने आता वांद्रे येथील कलानगर परिसरात चोख बंदोबस्त करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा पथकातील काही कर्मचारी जे या चहा विक्रेत्याच्या टपरीवर जात असत त्यांना सुद्धा खबरदारीचा पर्याय म्हणून विलगीकरणात राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. महाराष्ट्रात Lock Down 15 एप्रिल ला संपेल असं गृहीत धरू नका: आरोग्यमंत्री राजेश टोपे
प्राप्त माहितीनुसार, आज मुंबई महापालिकेच्या वतीने हा कलानगर परिसर मुंबई महानगर पालिकेने containment zone म्हणून जाहीर करण्यात आला तसे पोस्टर्स सुद्धा या भागात लावण्यात आले आहेत. या भागातील संचारबंदी अधिक कडक केली आहे.
ANI ट्विट
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या 'मातोश्री' निवासस्थानाच्या प्रवेशद्वाराच्या काहीच अंतरावर ही चहाची टपरी होती. या चहावाल्याची बाहेरगावाहून आल्याची तरी कोणतीही माहिती अद्याप नाही त्यामुळे हा व्यक्ती कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने त्याला लागण झाली असलणार असे अंदाज बांधले जात आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून उद्धव ठाकरे यांचे अंगरक्षक आणि कार्यलयीन कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे.
दुसरीकडे, महाराष्ट्रात आता कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 868 वर पोहचली आहे. यामध्ये सर्वाधिक रुग्ण हे मुंबईत (526) असून त्यापाठोपाठ पुणे (141) आणि ठाणे (85) अशी रुग्णांची संख्या आहे. कोरोना हा अजूनही सामुदायिक प्रसाराच्या टप्पयात पोहचलेला नाही मात्र खबरदारी घेणे हा एकमेव मार्ग सध्या सर्वांकडे आहे.