Congress, BJP MLA meets Sharad Pawar: भाजप आमदार आशिष शेलार, काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्याकडून शरद पवार यांची भेट; दिल्ली निवास्थानी चर्चा
त्यामुळे राज्यातील महाविकासआघाडी सरकारने याबाबत वेळीच योग्य तो निर्णय घ्यावा. ही भावना पवार यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी ही भेट घेतल्याचे शेलार यांनी या वेळी सांगितले.
राज्यात मराठा आरक्षणावर (Maratha Reservation) मुद्द्यावरुन निर्माण झालेला पेच कसा सोडवायचा याबातब राज्य सरकारच नव्हे तर विविध राजकीय पक्षांसमोरही मोठा प्रश्न आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप (BJP ) आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) राष्ट्रवादी काँग्रेस (Congress) अध्यक्ष (NCP) शरद पवार (Sharad Pawar) यांच्यात दिल्ली निवासस्थानी चर्चा झाली. दुसऱ्या बाजूला काँग्रेस नेते आणि मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनीही शरद पवार यांची सकाळीच दिल्ली येथे भेट घेतली आहे. विरोधी आणि सत्ताधारी पक्षांचे नेते शरद पवार यांच्या निवास्थानी गेल्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा तर सुरु झाल्यात.
महाविकासआघाडी सरकारवर जोरदार टीका करणारे भाजप नेते अशी आशिष शेलार यांची ओळख आहे. हेच आशिष शेलार आता शरद पवार यांच्या भेटीस पोहोचले आहेत. त्यामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. मात्र, स्वत: आशिष शेलार यांनीच याबाबत माहिती दिली. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यातील नागरिकांच्या भावना तीव्र आहेत. त्यामुळे राज्यातील महाविकासआघाडी सरकारने याबाबत वेळीच योग्य तो निर्णय घ्यावा. ही भावना पवार यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी ही भेट घेतल्याचे शेलार यांनी या वेळी सांगितले.
दरम्यान, आज सकाळी काँग्रेस नेते आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी शरद पवार यांची भेट घेतली. ही भेट संपल्यानंतर अवघ्या काही वेळातच आशीष शेलार हे पवार यांच्या भेटीस पोहोचले आहेत. शेलार यांनी मागच्या काही दिवसात पवार यांची भेट घेण्याची ही पहिलीच वेळ नाही. अलिकडेच शेलार यांनी मुंबई येथे पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर झालेली ही दुसरी भेट आहे. (हेही वाचा, MP Sambhajiraje Chhatrapati on Maratha Reservation: मराठा आरक्षण मुद्द्यावर महाराष्ट्र राज्य सरकार हतबल- खासदार संभाजीराजे छत्रपती यांचा आरोप)
दरम्यान, मुंबईत सह्याद्री अतिथीगृह येथे महाविकासआघाडी समन्वय समितीची एक बैठक पार पडत आहे. महाविकासाघाडीत विविध मुद्द्यांवर सुरु झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला महत्त्व प्राप्त झाले आहे. प्रामुख्याने औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर करण्यावरु सुरु झालेल्या वादावर काय तोडगा निघतो याबाबत उत्सुकता आहे. रखडलेल्या महामंडळ नियुक्तीवरही या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.