Maratha Morcha in Mumbai: मराठा मोर्चा 20 जानेवारीला मुंबईत दाखल होणार, मनोज जरांगे उपोषण करणार

त्यामुळे 20 जानेवारीला मुंबईत आमरण उपोषण करण्यात येईल. 20 जानेवारीला मुंबईतील आझाद मैदानावर मी आमरण उपोषण करणार आणि मला भेटण्यासाठी मराठे येतील.” अशी घोषणा मनोज जरांगे यांनी केली आहे.

Manoj Jarange | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

आरक्षणाच्या मागणीसाठी आता मराठा मोर्चा (Maratha Morch) थेट मुंबईत (Mumbai) दाखल होणार असल्याची घोषणा मराठा नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी केली आहे. बीड (Beed) येथे आयोजित इशारा सभेत त्यांनी ही माहिती दिली आहे. राज्य सरकार वेळकाढूपणा करत मराठ्यांची फसवणूक करतंय, आम्हालासुद्धा मर्यादा आहे, आम्ही तरी किती दिवस दम काढणार? मराठ्यांना विचारल्याशिवाय मी काही करणार नाही. आपण फक्त लढायचं नाही तर जिंकायचं सुद्धा आहे असं मनोज जरांगे म्हणाले. मुंबईत मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) आमरण उपोषण करण्याची मोठी घोषणाही मनोज जरांगे यांनी केली आहे.  (हेही वाचा - Maratha Reservation: 'मनोज जरांगे यांना देवही घाबरतो, सरकारने त्यांचं ऐकवं, माझाही त्यांना पाठिंबा')

“सरकारनं मराठ्यांना नोटीसा दिल्या आणि मुंबईत 18 जानेवारीपर्यंत 144 कलम लागू केलं. त्यामुळे 20 जानेवारीला मुंबईत आमरण उपोषण करण्यात येईल. 20 जानेवारीला मुंबईतील आझाद मैदानावर मी आमरण उपोषण करणार आणि मला भेटण्यासाठी मराठे येतील.” अशी घोषणा मनोज जरांगे यांनी केली आहे.

“शांततेच्या आणि कायदेशीर मार्गानं आपण उपोषण करू. पण, कोण कुठं बसेल माहिती नाही. रोड मोकळी करून बसण्याची व्यवस्था करावी. नाहीतर आमच्या धोरणाने आम्ही बसू. मात्र, मराठ्यांनी मुंबईकडे कूच केली, तर विराट समुदाय माघारी फिरणार नाही. आरक्षण घेऊनच माघारी फिरू,” असा इशारा जरांगेंनी  दिला आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif