Maharashtra Winter Update: महाराष्ट्र गारठला! मुंबईसह राज्यभरात पारा घसरण्याची शक्यता, हवामान विभागाकडून विशेष सुचना जारी

महाराष्ट्रातील काही भागात थंडीमुळे हुडहुडी भरलेली असताना आता तापमानाचा पारा पुन्हा घसरणार असल्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

Nashik Winter | PC: unsplash.com

गेल्या २ आठवड्यांपासून राज्यभरातील जनतेला हुडहुडी भरली आहे. रोज निच्चांकी तापमान गेल्या दिवसांचा विक्रम मोडतांना दिसत आहे. उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा गारठला असुन राज्यभरात थंडीची लाट आली आहे. तरी हवामान विभागाकडून तीव्र शीत लाटेची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भातील नागपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावती या जिल्ह्यांमध्ये गेल्या नऊ वर्षातील सर्वात निच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. एवढचं नाही तर पुढील या संपूर्ण आठवडाभर विदर्भाला थंडीचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्रात देखील कडाक्याची थंडी पडताना दिसत आहे. नाशिक, धुळे, नंदूरबार या शहरातील तापमानाचा आकडा कमालीचा घसरला आहे. तरी पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापुर, सांगली, सातारा हे जिल्हे देखील थंडीने चांगलेचं गारठले आहेत.

 

राज्यात कितीही थंडी पडली तर मुंबईत मात्र दरवर्षीचं फारशी थंडी नसते. तरी हा वर्षिच्या हिवाळ्याने मात्र गेल्या कित्येक वर्षातील तापामानाचे आकडे मोडत यावर्षी राज्याची राजधानी मुंबईने देखील थंडीचे सगळेचं रेकॉर्डस ब्रेक केले आहे. तरी या आठवड्यात मुंबई शहरासह उपनरात कडाक्याची थंडी पडणार असल्याची शक्यता हावामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. (हे ही वाचा:-Maharashtra Winter Update: मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात थंडीची लाट! हवामान विभागाकडून अलर्ट जारी)

 

तुरळक थंडीची जाणीव होणाऱ्या मुंबई शहरात काल यावर्षीच्या हिवाळ्याती सर्वात निच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. विशेष दक्षिण मुंबईत सर्वात निच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. उद्या देखील मुंबईतील किमान तापमानात आणखी घट होण्याचा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान केंद्रानं व्यक्त केला आहे. तसेच मुंबई शहरासह उपनगरात १४ आणि १५ जानेवारीला सर्वात निच्चांकी तापमानाची नोंद होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.