IPL Auction 2025 Live

Maharashtra Weather Update: 7 ते 10 एप्रिल दरम्यान राज्यात गारपिटीसह पावसाच्या हजेरीची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज

7 ते 10 एप्रिल दरम्यान विजांच्या कडकडाटासह पाऊस हजेरी लावणार आहे.

Rain | representative pic- (photo credit -pixabay)

Maharashtra Weather Update: राज्यातील कमाल आणि किमान तापमानात(Heat) चांगलीच वाढ झाली आहे. बहुंताश ठिकाणी तापमानाचा पारा 40 अंशाच्या पुढे गेला आहे. एकीकडे मुंबई शहरासह इतरही भागात उन्हाची काहिली जाणवत आहे. दुसरीकडे, हवामान विभागानेही पावसाचा इशारा दिला आहे. 7 ते 10 एप्रिल दरम्यान तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह (thunderstorm ) पावसाची शक्यता आहे. म्हणजेच एप्रिलच्या सुरुवातीलाच पावसाची (Rain) शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. (हेही वाचा : Maharashtra Weather Update: दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात रात्री वातावरण उष्ण राहण्याचा अंदाज )

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईसह राज्यातील अनेक भागांत उन्हाचा कडाका वाढला आहे. दुपारी 12 ते 3 या काळात उकाडा प्रचंड वाढत आहे. नागरिकांना घराबाहेर पडणेही मुश्कील झाली आहे. एप्रिल-मेमध्ये तर परिस्थीती आणखी खराब होण्याची शक्यता आहे. उन्हाचा पारा आणखी वाढेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. 7 ते 10 एप्रिल या काळात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह गारपीट, हलका ते मध्यम पाऊस आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. विदर्भात काही ठिकाणी ऑरेंज अलर्टसह गारपीट होण्याची शक्यता, हवामान विभागाने वर्तवली आहे.

आंध्रप्रदेश, रायलसीमा, पश्चिम बंगाल, बिहार, तेलंगणा, झारखंड, उत्तर अंटार्टिका, झारखंड, कर्नाटक आणि ओडिशा या भागात उष्णतेची लाट आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. तर, राज्यात मुंबईसह कोकणातील 7 जिल्ह्यात तसेच गोव्यात 7 एप्रिल रोजी दिवसा उष्णतेचा अनुभव येईल, असं हवामान विभागाने म्हटलं आहे.