Maharashtra Weather Update 28 Jan: मुंबई, उत्तर कोकण व गोव्यात उद्या ढगाळ वातावरणात मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता
मुंबईत उद्या आकाश ढगाळ राहील असा अंदाज आहे.
मुंबई (Mumbai) सह महाराष्ट्रात मागील दोन ते तीन दिवसांपासून थंडीचा जोर काहीसा ओसरला आहे, तर दुसरीकडे, उद्याच्या दिवशी म्हणजेच 28 जानेवारी रोजी मुंबई सह महाराष्ट्रातील काही भागात ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे. स्कायमेट वेदर या वेबसाईटतर्फे याबाबत शक्यता वर्तवण्यात आली आहे, यानुसार उद्याच्या दिवसात मुंबई, उत्तर कोकण (North Konkan) व गोव्यात (Goa) एक ते दोन ठिकाणी मेघ गर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता आहे. मुंबईत उद्या आकाश ढगाळ राहील असा अंदाज आहे. Mumbai Winter Memes: मुंबईकरांना कुडकुडायला लावणार्या थंडीचे सोशल मीडिया मध्ये मिम्स व्हायरल!
स्कायमेटच्या अंदाजानुसार, देशभरात अन्य राज्यात देखील उद्या पावसाची शक्यता आहे. वास्तविक यंदा मागील अनेक वर्षातील रेकॉर्ड ब्रेक करत जोरदार पाऊस झाला होता, आता जानेवारी महिना उजाडला तरी शेजारील समुद्रकिनारी वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे पावसाचा कमी अधिक प्रभाव दिसून येत आहे.
पहा ट्विट
दरम्यान, काही दिवसांपूर्वी उत्तरेकडून वाहणार्या थंड वार्यांमुळे मुंबई, नाशिक, पुणे, नागपूर शहरामध्ये थंडीचं प्रमाण वाढलं होतं. मध्यंतरी तापमानाचा पारा वाढल्याने पुन्हा थंडी गायब झाली होती. मात्र मुंबई हवामान खात्याने (IMD Mumbai) वर्तवलेल्या अंदाजानुसार आता 26 जानेवारीपासून पुन्हा महाराष्ट्रात थंडी परतण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवसांमध्ये मुंबई शहरामध्ये तापमान 15 अंशांच्या खाली जाण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.