Maharashtra Weather Forecast: राज्यात पावसाचे जोरदार पुनरागमन, पुढील तीन ते चार दिवस मेघगर्जनेस पावसाचा हवामान विभागाचा अंदाज
हवामान खात्याने 3-4 दिवस अनेक जिल्ह्यांना पावसाचा इशारा दिला आहे. मंगळवारी मराठवाडा, विदर्भ, कोकणासह अनेक भागात जोरदार पाऊस झाला. पावसामुळे खरीप हंगामातील पिकांना जीवदान मिळालं असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
Maharashtra Weather Forecast: मान्सूनचा (Maharashtra Monsoon) आस असलेला कमी दाबाचा पट्टा बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. त्यामुळे रायलसिमा आणि परिसरावर 900 मीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. परिणामी महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची (Heavy Alert) शक्यता निर्माण झाली आहे असे हवामान विभागाने(Weather Forecast) म्हटले आहे. यापार्श्वभूमीवर आज रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगाव, पुणे, सातारा आणि सांगली जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. (हेही वाचा: Pune Water Cut on August 22: पुणे महानगर पालिकेकडून देखभालीच्या कामासाठी गुरूवारी पाणी कपात जारी; पहा कोणत्या भागात होणार परिणाम? )
2 आठवड्याच्या विश्रांतीनंतर सोमवारी राज्यात पावसाने जोरदार पुनरागमन केलं. मंगळवारी मराठवाडा, विदर्भ, कोकणासह अनेक भागात जोरदार पाऊस झाला. पावसामुळे खरीप हंगामातील पिकांना जीवदान मिळालं असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, हवामान खात्याने आज बुधवारी देखील अनेक जिल्ह्यांना पावसाचा इशारा दिलाय. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, नंदुरबार, धुळे, नाशिक, अहमदनगर, पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातही विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे.
आजपासून पुढील तीन-चार दिवस राज्यातील विविध भागात मेघगर्जनेसह पावसाच्या सरी बरसणार, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. सध्या दक्षिण बांग्लादेशात कमी दाबाचे क्षेत्र कायम असून येत्या 24 तासांत ही प्रणाली वायव्येकडे सरकण्याची शक्यता आहे. विदर्भ मराठवाड्याला पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, धाराशिव जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे.
विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळमध्ये जोरदार पाऊस पडू शकतो. याशिवाय वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांनाही पावसाचा अलर्ट देण्यात आलाय. पुढील तीन-चार दिवस राज्यात पावसाची अशीच स्थिती कायम राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगावी असं आवाहन करण्यात आलं आहे.
(The above story first appeared on LatestLY on Aug 21, 2024 08:44 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

