नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जोरदार मुसंडी मारत पुन्हा आघाडीवर
2014 च्या विधानसभा निवडणुकीत भरघोस मतांनी विजय झालेले भाजपचे उमेदवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) 2019 पहिल्या काही फेरीत पिछाडीवर असलेले फडणवीसांनी पुन्हा आघाडी घेतलीआहे.
2014 च्या विधानसभा निवडणुकीत भरघोस मतांनी विजय झालेले भाजपचे उमेदवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) 2019 पहिल्या काही फेरीत पिछाडीवर असलेले फडणवीसांनी पुन्हा आघाडी घेतलीआहे. त्यामुळे पुन्हा एकदा भाजपाच्या विशेष करुन फडणवीसांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत असे म्हणायला हरकत नाही. काही वेळात अंतिम निकाल हाती येणार असून 2014 च्या विधानसभा निवडणुकीची रीघ ओढत देवेंद्र फडणवीस पुन्हा बाजी मारणार का हे काही वेळातच कळेल. मतमोजणीच्या सर्व फे-या पुर्ण व्हायच्या असून अंतिम निकाल येणे बाकी आहे.
फडणवीसांविरुद्ध 2014 साली काटोल मतदारसंघातून निवडून आलेले काँग्रेसचे डॉ. आशिष देशमुख रिंगणात उतरले आहेत. आशिष देशमुख यांनी 2 ऑक्टोबर 2018 रोजी आमदारकीचा राजीनामा दिला. तेव्हापासून काटोलची जागा रिक्त होती. मात्र आता ते नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघातून लढणार असून फडणवीस विरुद्ध देशमुख हे बिग फाईट असल्याचे बोलले जात आहे.
हेदेखील वाचा- महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 2019: 'हे' 5 उमेदवार ठरत आहेत भाजप-शिवसेना महायुतीसाठी डोकेदुखी
थोडक्यात नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघात सध्या अटीतटीची लढत सुरु असून काही तासांतच अंतिम निकाल हाती येईल असे सांगण्यात येत आहे. जोरदार मुसंडी मारत देवेंद्र फडणवीसांनी घेतलेली ही मतांची आघाडी त्यांना मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचवणार का हे काही वेळातच स्पष्ट होईल.