Maharashtra SSC Result 2024 : दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! 27 मे रोजी निकाल लागणार, बोर्डाने दिली अधिकृत माहिती

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा दहावीचा निकाल 27 मे रोजी दुपारी एक वाजता जाहीर करण्यात येणार आहे. बारावीचे निकाल जाहीर होताच सर्वांच्या नजरा दहावीच्या निकालांकडे लागल्या होत्या. त्यामुळे आला पालाकांसह विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली आहे.

Maharashtra SSC Result 2024 : दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी!  27 मे रोजी निकाल लागणार, बोर्डाने दिली अधिकृत माहिती
Student (Pic credit ANI - Twitter)

Maharashtra SSC Result 2024: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावीच्या निकालाची (Maharashtra SSC Result 2024) तारीख जाहीर करण्यात आली आहे. 27 मे रोजी दुपारी एक वाजता दहावीचा निकाल जाहीर करण्यात येणार असल्याचे बोर्डाने सांगितले आहे. बारावीचा निकाल 21 मे रोजी जाहीर केल्यानंतर सर्वांच्या नजरा दहावीच्या निकालांकडे लागल्या होत्या. (हेही वाचा:Maharashtra Board HSC, SSC Result 2024: MSBSHSE कडून इयत्ता 10, 12 बोर्ट परिक्षाचे निकाल hscresult.mkcl.org वर अल्पावधीतच होणार जाहीर, विद्यार्थ्यांना उत्सुकता; अध्याप अधिकृत सूचना नाहीच )

या वेबसाईटरवर निकाल पहा

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च महिन्यात दहावीच्या परीक्षा घेण्यात आलेल्या होत्या. दाहवीचा निकाल mahresult.nic या वेबसाईटवर उपलब्ध होईल. याशिवाय आणखी काही वेबसाईटवर निकाल विद्यार्थ्यांना पाहता येईल. डिजीलॉकरद्वारे देखील निकाल पाहता येऊ शकतो.

.

(The above story first appeared on LatestLY on May 25, 2024 02:02 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).