Maharashtra Municipal Corporation By - Elections 2019: पुणे, उल्हासनगर , नाशिक, परभणी, मालेगाव, चंद्रपूर, कोल्हापूर, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई महापालिकांमध्ये पोटनिवडणूक
त्यापैकी पुणे महापालिका हद्दीत 11 गावांचा समावेश नव्याने करण्यात आला. त्यामुळे दोन नगरसेवकांची संख्या ग्राह्य धरली आहे. त्यानुसार दोन नगरसेवकांचा मिळून एक प्रभाग तयार करण्यात आला आहे. त्यासाठीच ही पोटनिवडणूक होत आहे.
Maharashtra Municipal Corporation By - Elections 2019: महाराष्ट्रातील महानगरपालिकांच्या पोटनिवडणुका जाहीर झाल्या आहेत. पुणे (Pune), उल्हासनगर ( Ulhasnagar), नाशिक(Nashik), परभणी (Parbhani), मालेगाव (Malegaon), चंद्रपूर (Chandrapur), कोल्हापूर ( Kolhapur), कल्याण-डोंबिवली (Kalyan-Dombivli), आणि नवी मुंबई (Navi Mumbai ) या महापालिकांमधील काही प्रभागांमध्ये या निवडणुका पार पडतील. त्यासाठी येत्या 23 जून रोजी मतदान पार पडणार आहे. तर, त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 24 मे रोजी मतमोजणी होणार आहे.
दरम्यान, या महापालिकांपैकी पुणे महापालिका पोटनिवडणुकीसाठी अचारसंहिताही लागू झाली आहे. निवडणूक असलेल्या या प्रभागांमध्ये प्रभाव टाकणारी कोणतीही कृती मंत्री, आमदार, खासदार, नगरसेवक तसेच इतर पदाधिकाऱ्यांना करता येणार नाही. तसे करणे हे अचारसंहितेचा भंग असणार आहे. (हेही वाचा, Cooperative Societies Election 2019: राज्यात सहकारी संस्था निवडणूक 1 जूनपासून)
निवडणूक कार्यक्रम
नामनिर्देशन पत्र स्वीकारणे : ३० मे ते ६ जून
नामनिर्देशन पत्रांची छानणी : ७ जून
उमेदवारी अर्ज मागे घेणे : १० जून
मतदान : २३ जून , निकाल : २४ जून
पोटनिवडणुका असलेल्या महापालिकांची नावे
पुणे, उल्हासनगर, नाशिक, परभणी, मालेगाव, चंद्रपूर, कोल्हापूर, कल्याण-डोंबिवली, आणि नवी मुंबई
दरम्यान, राज्यभरातील नऊ महापालिकांसाठी पोटनिवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्यापैकी पुणे महापालिका हद्दीत 11 गावांचा समावेश नव्याने करण्यात आला. त्यामुळे दोन नगरसेवकांची संख्या ग्राह्य धरली आहे. त्यानुसार दोन नगरसेवकांचा मिळून एक प्रभाग तयार करण्यात आला आहे. त्यासाठीच ही पोटनिवडणूक होत आहे.