Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल

जर तुम्ही विजेते असाल तर लॉटरींचे बक्षिस मिळण्यासाठी काही कागदपत्रांची गरज असते. तुमचा क्रमांक भाग्यवान विजेत्यांमध्ये असल्यास तिकीटाच्या मागे असलेल्या क्रमांकावर तुम्ही संपर्क करावा.

Photo Credit- X

Maharashtra Results: पद्यिनी (Padyini), महा. गजलक्ष्मी मंगळ (Maha Gajalakshmi Mangal), गणेशलक्ष्मी शुभ (Ganeshlakshmi Shubh), महा. सह्याद्री महालक्ष्मी (Maha Sahyadri Mahalakshmi) लॉटरींची सोडत आज मंगळवारी दिनांक 3 जून 2025 रोजी जाहीर होणार आहे. लॉटरी निकाल हा lottery.maharashtra.gov.in या वेबसाईटवर दररोज दुपारी 4 वाजून 15 मिनीटांनी जाहीर केला जातो. प्रत्येक सोडत ही दर 15 मिनिटींच्या फरकाने होते. त्यामुळे जर तुम्ही लॉटरी खेरदी करत असाल तर, या संकेतस्थळावर तुम्ही खरेदी केलेली लॉरटी ती चेक करू शकता. आज जाहीर होणाऱ्या लॉटरींमध्ये पद्यिनीचे पहिले बक्षिस 7 लाखांचे आहे. तर उर्वरीत महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची बक्षिसे ही अनुक्रमे 10 हजारांची आहेत. महा. गजलक्ष्मी मंगळ ची 5 बक्षिसे 10 हजारांची असणार आहेत.

lottery.maharashtra.gov.in ओपन करा. त्यानंतर 'लॉटरी निकाल' या पर्यायावर क्लिक करा. त्यापुढे 'महाराष्ट्र लॉटरी निकाल' वर क्लिक करा. यानंतर लॉटरीच्या नावांप्रमाणेच तुम्ही ज्या लॉटरीचं तिकीट काढलं आहे त्यावर क्लिक करा. पीडीएफ स्वरूपातील एक फाईल ओपन होईल. या पीडीएफ फाईल स्वरूपातील निकालामध्ये प्रत्येक लॉटरीच्या विजेत्याचा क्रमांक तुम्हांला पाहता येऊ शकतो.

महाराष्‍ट्र शासन तीन राष्‍ट्रीय सुटीचे दिवस वगळून साप्ताहिक सर्व दिवशी सोडती आयोजित करते. प्रत्‍येक आठवडयात एकूण 27 सोडती असतात. तसेच 4 मासिक सोडती व वर्षाला 6 भव्यतम सोडत असतात. ज्यांचा तपशील lottery.maharashtra.gov.in या संकेस्थळावर दाखविला जातो. यामध्ये प्रत्येक महिन्याला 30 व्यक्ती लखपती होऊ शकतात.

जर तुम्ही विजेते असाल तर तुम्हाला बक्षिस मिळण्यासाठी काही गोष्टींची माहिती असणे महत्त्वाचे आहे. लॉटरींचे बक्षिस मिळण्यासाठी काही कागदपत्रांची गरज असते. तुमचा क्रमांक भाग्यवान विजेत्यांमध्ये असल्यास तिकीटाच्या मागे असलेल्या क्रमांकावर तुम्ही संपर्क करावा. त्याशिवाय, Maharashtra State Lottery claim form वर आवश्यक माहिती भरा. यामध्ये पत्ता, मोबाइल नंबर,पॅन कार्ड, आधार कार्ड, ही माहिती भरणं आवश्यक असते.सोबत 2 साक्षीदारांची माहिती देणं आवश्यक आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement