Maharashtra IPS Transfer List 2025: राज्यातील वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर

IPS Officers Posting 2025: महाराष्ट्र सरकारने जून 2025 मध्ये मोठ्या प्रमाणावर आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. नवीन बदली यादीमध्ये अमरावती, कोल्हापूर, पुणे, मुंबई, नाशिकसह विविध जिल्ह्यांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

Maharashtra IPS Transfer List 2025: राज्यातील वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर
Government of Maharashtra | (Photo Credits: Archived, Edited, Symbolic Images)

IPS Reshuffle List: महाराष्ट्र सरकारने मोठ्या प्रमाणावर आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या (Maharashtra IPS Transfer) केल्या असून, राज्यातील अनेक जिल्ह्यांतील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे स्थानांतर करण्यात आले आहे. बदल्यांची ही यादी पोलीस महासंचालनालयातर्फे अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार राज्यातील 51 आएएस आणि आयपीएस (IPS) अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. खास करुन बदली झालेल्या अधिकाऱ्यांमध्ये पुणे, मुंबई (Mumbai), नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, ठाणे, धुळे, हिंगोली, जळगाव जिल्ह्यांचा समावेश आहे. अनेक अधिकाऱ्यांना पदोन्नती तर काहींना वेगळा पदभार देण्यात आला आहे. जाणून घ्या कोणत्या अधिकाऱ्याची कुठे बदली.

बदली झालेल्या काही महत्त्वाच्या अधिकाऱ्यांची माहिती:

  • पवन बनसोडे, पोलीस अधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, अमरावती → पोलीस उप आयुक्त, ठाणे शहर
  • विजय पवार, प्राचार्य, पोलीस प्रशिक्षण केंद्र, ढुटे → पोलीस उप आयुक्त, पश्चिम विभाग, ठाणे
  • स्मिता पाटील, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ 12, मुंबई → पोलीस उप आयुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई
  • नितीन पवार, पोलीस उप आयुक्त, मुख्यालय, मुंबई → प्राचार्य, पोलीस प्रशिक्षण केंद्र, मरोल, मुंबई
  • कल्याणी बारवकर, पोलीस उपायुक्त, अमरावती शहर → अप्पर पोलीस अधीक्षक, सांगली
  • सुधीर लोखंडे, पदस्थापन प्रतीक्षेत → पोलीस उप आयुक्त, पश्चिम विभाग, ठाणे
  • जयश्री देसाई, पदस्थापन प्रतीक्षेत → समादेशक, रा. पो. बल गट क्र. 4, चंद्रपूर
  • मनीषा दुबळे, पोलीस अधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, कोल्हापूर → पोलीस अधीक्षक, शस्त्र निरीक्षण शाखा, पुणे
  • दीपक देवरस, सहायक पोलीस महासंचालक, आर्थिक गुन्हे शाखा, मुंबई → पोलीस अधीक्षक, नागरी हक्क संरक्षण, ठाणे
  • प्रज्ञा जधे, पोलीस उप आयुक्त, वाहतूक, पुणे → पोलीस अधीक्षक, शस्त्र निरीक्षण शाखा, पुणे

या बदल्यांमध्ये अनेक अधिकाऱ्यांना राज्य गुप्तवार्ता विभाग, गुन्हे अन्वेषण, प्रशिक्षण संस्था, वाहतूक शाखा, नागरी हक्क संरक्षण अशा विविध संवेदनशील आणि महत्त्वाच्या पदांवर नेमण्यात आले आहे. सरकारकडून महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 च्या कलम 22अंतर्गत प्रशासकीय कारणास्तव ही बदली करण्यात आली असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

(The above story first appeared on LatestLY on Jan 01, 1970 05:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).