President Draupadi Murmu on Lakhpati Didi: राज्यात '25 लाख महिलांना लखपती दीदी बनवण्याचे लक्ष्य'; लातूरमध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते लाडक्या बहिणींचा गौरव

सोमवारी 2 सप्टेंबरला त्यांचा महाराष्ट्र दौरा सुरू झाला आज त्यांनी लातूर जिल्ह्यात उपस्थिती लावली. महाराष्ट्रात 25 लाख महिलांना लखपती दीदी बनवण्याचे लक्ष्य असल्याचे द्रौपदी मुर्मू म्हणाल्या.

President Draupadi Murmu (PC - ANI)

President Draupadi Murmu on Lakhpati Didi: सोमवारी कोल्हापूर जिल्ह्यातील वारणानगर येथे ‘श्री वारणा महिला सहकारी समूहा’च्या सुवर्णमहोत्सवी सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ( Draupadi Murmu)सहभागी झाल्या होत्या. त्यानंतर काल मंगळवारी ३ सप्टेंबर रोजी पुणे येथील ‘सिम्बायोसिस इंटरनॅशनल’च्या २१ व्या दीक्षांत समारंभाला द्रौपदी मुर्मू यांनी संबोधित केले. आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा महाराष्ट्र दौऱ्याचा (Maharashtra Tour)शेवटचा दिवस आहे. त्यमुळे आज ४ सप्टेंबर रोजी लातूर जिल्ह्यातील उदगीर येथील बुद्ध विहाराचे उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते झाले. लातूरमध्ये त्यांनी महाराष्ट्र शासनाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘शासन आपल्या दारी’ आणि ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’तील लाभार्थ्यांच्या मेळाव्याला संबोधित केले. राज्य सरकारचे 25 लाख महिलांना लखपती दीदी(Lakhpati Didi) बनवण्याचे लक्ष्य असल्याचे द्रौपदी मुर्मू म्हणाल्या.

25 लाख महिलांना लखपती दीदी बनवण्याचे लक्ष्य