मुंबई: उद्धव ठाकरे मुख्यमंत्री शपथविधी; शिवाजी पार्क परिसरात वाहतूक मार्गात बदल
त्यामुळे मुंबई शहरातील वाहतूक व्यवस्थेवर प्रचंड ताण पडणार हे विचारात घेऊन मुंबई पोलिसांनी नागरिकांसाठी वाहतूक मार्गात बदल केला आहे. हा बदल आज दुपारी 3 ते रात्री 9 या कालावधीसाठी असणार आहे. बदल केल्यानंतर खुले असलेले वाहतूक मार्ग पुढील प्रमाणे.
Maharashtra Govt Formation: शिवसेना (Shiv Sena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) महाराष्ट्राचे 29 वे मुख्यमंत्री म्हणून आज आज (गुरुवार, 28 नोव्हेंबर 2019) सायंकाळी 6 वाजून 40 मिनिटांनी शपथ घेत आहेत. शिवाजी पार्क (Shivaji Park ) (शिवतीर्थ) या सोहळ्याला देशभरातील दिग्गज उपस्थित राहणार आहेत. तसेच, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) , काँग्रेस (Congress) या तिन्ही पक्षांचे कार्यकर्ते, शिवसैनिक तसेच महाराष्ट्रातील जनताही उपस्थित राहणार आहे. त्यामुळे मुंबई शहरातील वाहतूक व्यवस्थेवर प्रचंड ताण पडणार हे विचारात घेऊन मुंबई पोलिसांनी नागरिकांसाठी वाहतूक मार्गात बदल केला आहे. हा बदल आज दुपारी 3 ते रात्री 9 या कालावधीसाठी असणार आहे. बदल केल्यानंतर खुले असलेले वाहतूक मार्ग पुढील प्रमाणे.
वाहतूकीसाठी प्रतिबंध असलेले रस्ते
- स्वातंत्र्यवीर सावरकर मार्गावरील सिद्धिविनायक चौक ते माहीमच्या हरी ओम चौक
- राजा बढे चौक ते केळुस्कर मार्ग चौक
- ले. दिलीप गुप्ते चौक ते पांडुरंग नाईक मार्गाची दक्षिण वाहिनी
- गडकरी चौक ते केळुसकर मार्ग (दोन्ही वाहिन्या)
- एल जे मार्गावरील बाळ गोविंदास मार्ग ते पद्माबाई ठक्कर मार्ग
- किर्ती कॉलेज लेनियर काशीनाथ थुरु रोडपी. बाळू मार्ग. प्रभादेवी
- आदर्श नगर, वरळी कोळीवाडा
- आरके 4 रोड
- पाच गार्डन, माटुंगा
- सेनापती बापट मार्ग
- रानडे रोड
- पी एन कोटनीस मार्क
वाहनांना प्रवेशबंधी असलेले मार्ग व पर्यायी मार्ग
स्वातंत्र्यवीर सावरकर मार्गावरील सिद्धिविनायक चौक ते एम. बी. राऊत मार्गासह १६ मार्गावर वाहने उभी करता येणार नाहीत. यात केळुसकर मार्ग, एम. बी. राऊत मार्ग, पांडुरंग नाईक मार्ग, दादासाहेब रेगे मार्ग, ले. दिलीप गुप्ते मार्ग, एन. सी. केळकर मार्ग, कीर्ती महाविद्यालयाजवळील रस्ता, काशीनाथ धुरू मार्ग, प्रभादेवी येथील पी. बाळू मार्ग, वरळी कोळीवाडा येथील आदर्श नगर, रफी अहमद किडवई मार्ग, पाच उद्यान, सेनापती बापट मार्ग, रानडे रोड, हिंदुजा रुग्णालयाजवळील कोटनीस मार्ग या रस्त्यांचाही समावेश असणार आहे. (हेही वाचा, मुंबई: शिवतीर्थ येथे उद्धव ठाकरे घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ, शिवसैनिकांमध्ये उत्साह; देशभरातील अनेक दिग्गज राहणार उपस्थित)
मुंबई पोलीस ट्विट
दरम्यान, पश्चिम उपनगरातून येणाऱ्या बसेससाठी सेनापती बापट मार्गावरील कामगार मैदान, लोढा पार्क येथे, तर हलक्या वाहनांसाठी इंडिया बुल्स सेंटर, इंडिया बुल्स फायनान्स सेंटर आणि वर्ल्ड टॉवर्स येथील सार्वजनिक वाहनतळे आरक्षित ठेवली जाणार आहेत.