Maharashtra Budget 2020: महाविकास आघाडी सरकारच्या राज्य अर्थसंकल्पात तरुणांसाठी काय? वाचा सविस्तर

नुकताच महाविकास आघाडीने (Maha Vikas Aghadi) पहिला अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2020) सादर केला आहे. ठाकरे सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प असून यात काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी अर्थसंकल्प विधानसभेत मांडला होता.

Maharashtra Budget 2020: महाविकास आघाडी सरकारच्या राज्य अर्थसंकल्पात तरुणांसाठी काय? वाचा सविस्तर
Deputy CM Ajit Pawar (Photo Credits-ANI)

नुकताच महाविकास आघाडीने (Maha Vikas Aghadi) पहिला अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2020) सादर केला आहे. ठाकरे सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प असून यात काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी अर्थसंकल्प विधानसभेत मांडला होता. यात महिला सुरक्षा, आमदारांच्या निधीत वाढ आणि शेतकऱ्यांची कर्जमाफीसह बरेच महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. याशिवाय या अर्थसंकल्पात तरुणांसाठीही काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. देशात बेरोजगार वाढला असून तरूणवर्ग अधिक आढळतात. यामुळे बेरोजगार तरुणांना रोजगार मिळावा, यासाठी ठाकरे सरकारकडून महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहे. यात तरुणांना उद्योग उभारणीसाठी मदत, बरोजगारी प्रशिक्षण, स्थानिक मुलांना नोकरी, प्रत्येक हाताला काम, रोजगार निर्मिती कार्यक्रमाचा या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली आहे.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नेहमी तरुणांकडे लक्ष केंद्रीत करत असतात. तसेच त्यांनी तरुणांविषयी आपले मत मांडले आहेत. आता महाविकास आघाडीनेही तरुणांसाठी महत्वाचे निर्णय घेतले आहेत. संपूर्ण देशात बेरोजगारीचे प्रमाण वाढत चालले असून महाराष्ट्रातील तरूण नोकरी मिळवण्यासाठी अनेक प्रयत्न करत आहेत. बेरोजगारी हा मुद्दा अतिशय गंभीरतेचा विषय बनत चालला असून यात घट व्हावी म्हणून महाविकास आघाडीच्या सरकारने महत्वाचे पाऊल उचलले आहे. उद्योग क्षेत्रात काम करण्याची आवड असणाऱ्या तरुणांना ठाकरे सरकारकडून उद्योग उभारणीसाठी मदत केली जाणार आहे. तसेच महाराष्ट्रातील बेरोजगार तरुणांना नोकरी संदर्भात प्रशिक्षण दिले जाणार आहे. यासोबत ज्या ठिकाणी उद्योग कंपन्या उभारल्या जातात, अशा कंपनीत 80 टक्के स्थानिक मुलांना नोकरी मिळाव्यात याकरिता सरकार प्रयत्न करत आहे. तर, प्रत्येक हाताला काम देण्यावर सरकार भर देणार असून मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम राबवले जाणार आहेत. हे देखील वाचा- कोरोना व्हायरस दहशतीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अयोद्धा दौरा कार्यक्रमामध्ये बदल; शरयू नदीवर आरती रद्द

याशिवाय, राज्याच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अजित पवार यांनी आमदारांच्या निधीत एक कोटींची वाढ केली आहे. मुद्रांक शुल्कात एक टक्का सूट जाहीर करत अर्थमंत्री अजित पवार यांनी गृह खरेदीदारांना मोठा दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच अर्थसंकल्पात महिलांसाठी मोठी घोषणा, प्रत्येक जिल्ह्यात महिला पोलीस स्टेशन उभारणार येणार आहे. तर, 2 लाखांवर कर्ज असणाऱ्यांनाही दिलासा देणार, नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन निधी देण्यात येणार आहे. ठाकरे सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवार यांनी सर्वच क्षेत्रांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, बजेटच्या अखेरीस वाहनचालकांचा खिशाला कात्री लावणारी घोषणा करण्यात आली असून पेट्रोल-डिझेलच्या दरात एका रुपयाची वाढ करण्याचे अजित पवारांनी जाहीर केले.

(The above story first appeared on LatestLY on Mar 06, 2020 03:24 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).