Sanjay Raut on Suspension of BJP MLA: 'केले तुका झाले मका! आमच्यावर बॉम्ब टाकायला गेले, त्यांच्याच हाता फुटला'; शिवसेना खासदार संजय राऊत यांची भाजपवर टोलेबाजी

'भाजपवाले करायला गेले तुका झाले मका' असे म्हणत ते आमच्यावर बॉम्ब टाकायला गेले परंतू झाले भलतेच. तो बॉम्ब त्यांच्याच हातात फुटला', असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

Sanjay Raut (Photo Credits: PTI)

महाराष्ट्र विधिमंडळ पावसाळी अधिवेशनादरम्यान विधानसभा अध्यक्षांनी भाजपच्या 12 आमदारांचे वर्षभरासाठी निलंबन (Suspension of BJP MLA) केले. त्यानंतर आक्रमक झालेल्या भाजपने महाविकासआघाडी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. त्यानंतर शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले. 'भाजपवाले करायला गेले तुका झाले मका' असे म्हणत ते आमच्यावर बॉम्ब टाकायला गेले परंतू झाले भलतेच. तो बॉम्ब त्यांच्याच हातात फुटला', असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. संजय राऊत हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

विरोधकांकडून सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न होता. परंतू, त्यांचा प्रयत्न यशस्वी झाला नाही. त्यांची एक चूक त्यांना किती महागात पडू शकते हेही आता त्यांच्या लक्षात आले असेल, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला आहे. संजय राऊत यांनी सांगितले की, काल जो काही प्रकार घडला. त्याबाबत सांगायचे तर मी तर काही सभागृहात नव्हतो. परंतू, मझ्याप्रमाणेच आपणही आणि संपूर्ण महाराष्ट्राने कालचा गोंधळ पाहिला. विरोधक ज्या पद्धतीने काल वागले. त्यांनी ज्या पदधतीने भास्कर जाधव यांच्यासी वागले ते अत्यंत घृणास्पद आहे. विरोधकांनी त्यांना शिविगाळ केली, धक्काबुक्की केली. भास्कर जाधव तालिका समितीचे अध्यक्ष आहेत. हे वर्तन समर्थनिय नव्हते त्यामुळे त्यांचे निलंबन करण्याचा निर्णय सभागृहाने घेतला असावा, असे संजय राऊत यांनी म्हटले.

महाराष्ट्राचे विधिमंडळ पवित्र जागा आहे. आशा ठिकाणी गैरवर्तन करण्याची महाराष्ट्राची परंपरा नाही. महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासात असे कधीही घडले नाही. असा प्रकार उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये आपण पाहिला आहे. पाकिस्तानमध्येही असा प्रकार पाहायला मिळतो. त्यामुळे महाराष्ट्राची परंपरा इतरांसारखी होऊ नये यासाठी यासाठी राज्य सरकारने आमदारांच्या निलंबनाचा निर्णय घेतल्याचेही संजय राऊत यांनी म्हटले.