शिवसेना पक्षात बंडाळी की नाराजी? ऐरोली, बेलापूर मतदारसंघातून 200 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे 'मातोश्री'वर दाखल

बेलापूर विभागाचे शहरप्रमुख विजय माने यांच्यासह 50 पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे शिवसेनाजिल्हाध्यक्ष विठ्ठल मोरे यांच्याकडे या आधिचृ सोपवले आहेत. तर आज (मंगळवारी 1 ऑक्टोबर) त्यात आणखी काही पदाधिकाऱ्यांची भर पडली आहे. राजीनामा देणाऱ्या पदाधिकाऱ्यांची संख्या तब्बल 200 पर्यंत पोहोचल्याची माहिती आहे.

shivsena | (Photo Credit: File Photo)

Maharashtra Assembly Elections 2019:  शिवसेना-भाजप (Shiv Sena-BJP Alliance) युतीच्या जागावाटपाचा (Shivsena BJP Seat Distribution) तिढा दिवसेंदिवस अधिकच गुंतागुंतीचा होत चालला आहे. या गुंतागुंतीच्या परिणामांची पहिली झलक ऐरोली, बेलापूर विधानसभा मतदार संघात शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्याच्या रुपात पाहायला मिळात आहे. जागावाटपाच्या मुद्दयावरुन नाराज असलेल्या ऐरोली, बेलापूर मतदारसंघातील तब्बल 200 शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे (Resignation of 200 Shivsena Leader) 'मातोश्री' कडे (Matoshree) सोपले आहेत. त्यामुळे नाराजी आणि राजीनामा नाट्यामुळे निर्माण झालेला पेच आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) कसे सोडवतात याबाबत उत्सुकता आहे. युतीच्या जागावाटपता ऐरोली, बेलापूर हा मतदारसंघ भाजपला सुटणार असल्याची वृत्त धडकल्याने शिवसेना पदाधिकारी आणि लढवय्या शिवसैनिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. या नाराजीतूनच हे राजीनामे 'मातोश्री'वर धडकल्याची चर्चा आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते गणेश नाईक (Ganesh Naik Join BJP) यांनी नुकताच भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. गणेश नाईक हे मुळचे शिवसैनिक आणि शिवसेना नेते. जो शिवसेना सोडून जातो त्याला धडा शिकवायचा ही शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण आजही कट्टर शिवसैनिकांच्या मनात कायम आहे. त्यामुळे गणेश नाईक यांच्याबाबत कडव्या शिवसैनिकांच्या मनात प्रचंड नाराजी आहे. त्यातच ऐरोली आणि बेलापूर हे दोन्ही मतदारसंघ युतीच्या जागावाटपात भाजपला गेले तर गणेश नाईक यांचा प्रचार करण्यावाचून शिवसैनिकांना पर्याय असणार नाही. त्यामुळे कट्टर शिवसैनिक प्रचंड अस्वस्थ आहे. त्यामुळेच शिवसेनेच्या 200 पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिल्याचे वृत्त आहे. एबीपी माझा या वृत्तवाहिनीने याबाबत वृत्त दिले आहे.

बेलापूर विभागाचे शहरप्रमुख विजय माने यांच्यासह 50 पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे शिवसेनाजिल्हाध्यक्ष विठ्ठल मोरे यांच्याकडे या आधिचृ सोपवले आहेत. तर आज (मंगळवारी 1 ऑक्टोबर) त्यात आणखी काही पदाधिकाऱ्यांची भर पडली आहे. राजीनामा देणाऱ्या पदाधिकाऱ्यांची संख्या तब्बल 200 पर्यंत पोहोचल्याची माहिती आहे. (हेही वाचा, 'मातोश्री' आम्हाला वाचवा! शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी इच्छुकांची गर्दी)

नाराजांना सावरणार ज्येष्ठ

दरम्यान, शिवसेनेतील काही मंडळी नाराज असलेल्याची कल्पना शिर्ष नेतृत्वाला आहे. त्यामुळे डॅमेज कंट्रोल करण्याची जबाबदारी उद्धव ठाकरे यांनी सेनेतील ज्येष्ठ नेत्यांवर सोपवल्याचे समजते. त्यासाठी या नेत्यांना विभागवार जबाबदारी देण्यात आली असल्याचे वृत्त आहे. ही जबाबदारी यशस्वीपणे पार पडल्यास शिवसेनेचा संभाव्य मार्ग बराच सुखकर असणार आहे. परंतू, असे घडले नाही तर, मात्र बंडाळीची शक्यता नाकारता येत नाही.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now