Loksabha Election 2024 Satara Constituency: साताऱ्यात चुरशीची लढत! शरद पवार थेट पृथ्वीराज चव्हाणांना उमेदवारी देण्याची शक्यता

त्यामुळे शरद पवारांकडून तगडा नवा उमेदवाराचा शोध सुरू आहे. त्यातच आता शरद पवार थेट माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उमेदवारी देण्याची शक्यता असल्याचं म्हटलं जातं आहे.

Photo Credit - Instagram

Loksabha Election 2024 Satara Constituency: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (Sharad Pawar)गटाचे विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी साताऱ्यातून (Satara Constituency)निवडणूक लढण्यास नकार दिला आहे. दुसरीकडे भाजपकडून उदयनराजे (Udayanraje Bhosale) उमेदवारीसाठी इच्छूक आहेत. शरद पवार कोणत्याही परिस्थीतीत सातारा बालेकिल्ला त्यांच्या हातून सुटू देण्याच्या मनस्थितीत नाहीत. त्यामुळे, खुद्द शरद पवार या ठिकाणी निवडणुकीला उभे राहतील अशी चर्चाही मतदारसंघात रंगली होती. मात्र, शरद पवार महाविकास आघाडी(Mahavikas Aghadi)चा विचार करुन वेगळीच खेळी करण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळत आहेत. शरद पवारांकडून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांना उमेदवारी देण्याची शक्यता असल्याचं म्हटलं जातं आहे. (हेही वाचा :Lok Sabha Election 2024 : सातारा लोकसभेतून खासदार श्रीनिवास पाटील यांची माघार, प्रकृतीच्या कारणामुळे निवडणूक न लढवण्याचा निर्णय )

शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी रविवारी याचसंदर्भात चर्चा करण्यासाठी पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेतली होती. त्याशिवाय, विश्वासाचा आणि मोठं नाव असलेला उमेदवार म्हणून पृथ्वीराज चव्हाण साजेसे असल्याने महविकास आघाडीकडून त्यांच नाव समोर येत आहे. पृथ्वीराज चव्हाण हे उदयनराजे यांना तगड आव्हान देऊ शकतात असेही काहींचे म्हणणे आहे. त्यामुळे जयंत पाटील आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्यात रविवारी बंद दाराआड तासभर चर्चा झाल्याचीही माहिती मिळत आहे. मात्र जर पृथ्वीराज चव्हाण हे शरद पवार यांच्या मागणीनुसार निवडणूकीसाठी उभे राहिले तर काँग्रेसचा उमेदवार देऊन तो निवडणून आणण्याचा शरद पवारांचा नवा पॅटर्न या माध्यमातून देशापुढे येईल. (हेही वाचा :Praniti Shinde On BJP : भाजपने देशाला धर्माची आणि जातीची कीड लावली, देश ५० वर्ष मागे गेला; सोलापूरमध्ये प्रणिती शिंदे आक्रमक )

सध्या तरी शरद पवार गटाचा विचार केला तर साताऱ्यामधून 3 नावांची चर्चा सुरू आहे. यामध्ये राज्याचे माजी जलसंपदामंत्री शशिकांत शिंदे, माजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांचा. मात्र यापैकी कोणालाही उमेदवारी दिली तर केवळ शरद पवारांच्या नावावर या तिघांपैकी कोणालाही किती मतं पडतील याबद्दल शंकाच आहे.