Lok Sabha Elections 2019: महाराष्ट्र लोकसभा निवडणूक मतदान पहिला टप्पा तारीख, मतदारसंघ आणि उमेदवार यादी

म्हणूनच अशा मंडळींसाठी आम्ही पहिल्या टप्प्यात मतदान पार पडत असलेल्या मतदारसंघांची आणि उमेदवारांची यादी इथे देत आहोत.

Lok Sabha Elections 2019: Maharashtra First Phase Poll | (Only representative image)

Maharashtra First Phase Poll Date, Schedule, Constituencies And andidates List: महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान एकूण चार टप्प्यात पार पडते आहे. त्यापैकी मतदानाचा पहिला टप्पा 11 एप्रिल रोजी पार पडत आहे. या टप्प्यात एकूण सात मतदारसंघ आहेत. सातही मतदारसंघात राजकीय पक्षांनी आपापले उमेदवार जाहीर केले आहेत. उमेदवारांनी निवडणूक अर्ज दाखल केले असून, निवडणूक प्रचार देखील सुरु केला आहे. दरम्यान, राजकीय पक्षांनी उमेदवारांच्या अनेक याद्या वेगवेगळ्या वेळी जाहीर केल्यामुळे अनेकांना राजकीय पक्षांच्या उमेदवारांची नावे आणि त्यांचे मतदारसंघ माहित नसतात. म्हणूनच अशा मंडळींसाठी आम्ही पहिल्या टप्प्यात मतदान पार पडत असलेल्या मतदारसंघांची आणि उमेदवारांची यादी इथे देत आहोत. ही यादी प्रामख्याने काँग्रेस (Congress), राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) , भाजप (BJP) , शिवसेना (Shiv Sena), शेकाप, स्वाभिमानी शेतकरी संघटना, वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aghadi) आदी राजकीय पक्ष आणि आघाड्यांची आहे.

लोकसभा निवडणूक 2019:  महाराष्ट्र लोकसभा मतदारसंघ आणि राजकीय पक्ष उमेदवार यादी (मतदान टप्पानिहाय)

लोकसभा निवडणूक 2019:  महाराष्ट्र लोकसभा मतदारसंघ आणि राजकीय पक्ष उमेदवार यादी (पहिला टप्पा, मतदान 11 एप्रिल 2019)
मतदान दिनांक लोकसभा मतदारसंघ शिवसेना/भाजप उमेदवार काँग्रेस/राष्ट्रवादी उमेदवार बहुजन वंचित आघाडी आणि इतर उमेदवार
11 एप्रिल 2019

(गुरुवार)

वर्धा रामदास तडस (भाजप) चारुलता टोकस (काँग्रेस) धनराज वंजारी (BVH)
रामटेक कृपाल तुमाणे (शिवसेना किशोर उत्तमराव गजभिये (काँग्रेस) किरण रोडगे (BVH)
नागपूर नितीन गडकरी (भाजप) नाना पटोले (काँग्रेस)
भंडारा-गोंदिया सुनील मेंढे (भाजप) नाना पंचबुद्धे (राष्ट्रवादी काँग्रेस) एन. के नान्हे (BVH)
गडचिरोली-चिमूर  अशोक नेते (भाजप) नामदेव मुसंडी (काँग्रेस) रमेश गजबे (BVH)
चंद्रपूर हंसराज अहिर (भाजप) सुरेश उर्फ बाळू धानोरकर (काँग्रेस) राजेंद्र मोहोळ (BVH)
यवतमाळ-वाशिम भावना गवळी (शिवसेना) माणिकराव ठाकरे (काँग्रेस) प्रवीण पवार (BVH)

(हेही वाचा, Lok Sabha Elections 2019: महाराष्ट्र लोकसभा मतदारसंघ आणि काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप उमेदवार संपूर्ण यादी)

दरम्यान, मुख्य निवडणूक आयुक्त सुनील आरोरा यांनी लोकसभा निवडणूक प्रणाली आणि एकूण कार्यक्रमाची माहिती दिली. निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, संपूर्ण देशभरात एकूण 7 टप्प्यांत ही निवडणूक पार पडत आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात 20 राज्यांतील 91 मतदारसंघात निवडणूक पार पडेल. दुसऱ्या टप्प्यात 14 राज्यांतील 97 मतदारसंघा, तिसऱ्या टप्प्यात 14 राज्यातील 115 मतदारसंघात, तर चौथ्या टप्प्यात टप्प्यात 9 राज्यांतील 71 मतदारसंघात, पाचव्या टप्प्यात 7 राज्यांतील 51 मतदारसंघ, सहाव्या टप्प्यात 7 राज्यातील 59 मतदारसंघात व सातव्या आणि शेवटच्या टप्प्यात आठ राज्यातील 59 मतदासंघात मतदान पार पडणार आहे. महाराष्ट्रात 11, 18, 23 आणि 29 एप्रिल अशा चार चार टप्प्यात पार पडत आहे. तर,  23 मे रोजी मतमोजणी होणार आहे

Tags

Bharatiya Janata Party BJP Congress Party General Elections 2019 General Elections 2019 Candidate In Maharashtra List of Maharashtra Congress Lok Sabha Elections Candidates List of Maharashtra Lok Sabha Constituencies Lok Sabha Candidates List Lok Sabha Constituencies of Maharashtra Lok Sabha Elections 2019 Lok Sabha Elections 2019 Candidates List Lok Sabha Elections First Phase Poll Constituencies And andidates List Lok Sabha Elections Maharashtra First Phase Poll Schedule Maharashtra BJP Lok Sabha Elections Candidate List Maharashtra Legislative Constituencies Maharashtra Lok Sabha Constituency Maharashtra Lok Sabha Elections List Maharashtra Political Parties Nationalist Congress Party Lok Sabha Candidates list NCP Shetkari Kamgar Paksha Shiv Sena Shiv Sena Lok Sabha Elections Candidates List Vanchit Bahujan Aghadi काँग्रेस पक्ष भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र काँग्रेस लोकसभा उमेदवार यादी महाराष्ट्र भाजप लोकसभा उमेदवार यादी महाराष्ट्र राजकीय पक्ष लोकसभा उमेदवार यादी महाराष्ट्र लोकसभा निवडणूक उमेदवार यादी महाराष्ट्र लोकसभा मतदारसंघ यादी महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय लोकसभा निवडणूक २०१९ लोकसभा निवडणूक 2019 उमेदवार यादी वंचित बहुजन आघाडी वंचित बहुजन आघाडी उमेदवार यादी शिवसेना शिवसेना लोकसभा उमेदवार यादी सार्वत्रिक निवडणूक 2019