Latur Accident: लातूरमध्यल्या भीषण अपघातात 4 जणांचा जागीच मृत्यू

या भीषण अपघातात मृत्यू झालेले व्यक्ती हे मध्य प्रदेशातील इंदोर येथील कपड्याचे होलसेल व्यापारी असल्याची माहिती मिळत आहे. ते व्यापारासाठी लातूरच्या उदगीरकडे त्यांच्या कारने प्रवास करत होते.

Latur Accident: लातूरमध्यल्या भीषण अपघातात 4 जणांचा जागीच मृत्यू
Accident | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

लातूरमधून अपघाताची दुर्दैवी घटना समोर आली आहे. लातूरच्या निलंगा-देवणी महामार्गावर ही अपघाताची घटना घडली. या अपघातात कारचा चुराडा झाला आहे. लातूरमध्ये कार आणि ट्रकच्या भीषण अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. लातूरमधील निलंगा-देवणी महामार्गावरील धनेगाव पाटी येथे कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात कारमधील चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. ट्रक आणि कारची समोरासमोर धडक झाल्याने कारचा चुराडा झाला आहे.  (हेही वाचा - Traffic Jam on Navi Mumbai-Thane Belapur Road: ट्रक उलटल्याने अपघात; नवी मुंबई-ठाणे बेलापूर रोडवर वाहतूक कोंडी (Watch Video))

या भीषण अपघातात मृत्यू झालेले व्यक्ती हे मध्य प्रदेशातील इंदोर येथील कपड्याचे होलसेल व्यापारी असल्याची माहिती मिळत आहे. ते व्यापारासाठी लातूरच्या उदगीरकडे त्यांच्या कारने प्रवास करत होते. त्याचेळी अपघात झाला. मध्य प्रदेशातील चार व्यापारी लातूरच्या उदगीरकडे प्रवास करत होते. उदगीररकडून निलंग्याच्या दिशेने जाणारे कार आणि मालवाहू ट्रकची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात कारमधील चार व्यापाऱ्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघात प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

दरम्यान या घटनेनंतर बचाव पथकांनी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या ठिकाणी स्थानिकांच्या मदतीने बचावकार्य देखील सुरु करण्यात आले. या अपघातानंतर लातूरमधील निलंगा-देवणी महामार्गावरील धनेगाव पाटी याठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहतुक कोंडी अनुभवायला मिळाली. पोलीसांना या ठिकाणावरुन वाहतुक कोंडी हटवण्यास मदत केली तसेच लोकांना मोठ्या प्रमाणावर त्रास हा सहन करावा लागला.

(The above story first appeared on LatestLY on Apr 10, 2024 04:38 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).