कोल्हापूरकरांकडून लंगोट वाटप करत कोथरुड येथील साडी वाटपाचा निषेध
भाजप नेते आणि चंद्रकांत पाटील यांच्याकडून आमच्या विरोधात कोणी पैलवानच नाही, असे सांगण्यात आले होते. त्यांच्या वक्तव्याचा निषेधन नोंदविण्यासाठी आम्ही लंगोट वाटप केल्याचे शाहू सेना कार्यकर्त्यांनी म्हटले आहे.
भाऊबीज सणाचे औचित्य साधत नवनिर्वाचित आमदार आणि भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil यांनी कोथरुड ( Kothrud विधानसभा मतदारसंघत साडी वाटप (Distribution of saree) केले. या साडीवाटपाचे तीव्र पडसात कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात उमटले. चंद्रकांत पाटील हे कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. या पार्श्वभूमिवर कोल्हापूरातील शाहू सेना पदाधिकाऱ्यांनी भवानी मंडप येथील मोतीबाग येथील पैलवानांना लंगोट वाटत चंद्रकांत पाटील यांच्या साडी वाटपाचा निषेध नोंदवला आहे. भाजप नेते आणि चंद्रकांत पाटील यांच्याकडून आमच्या विरोधात कोणी पैलवानच नाही, असे सांगण्यात आले होते. त्यांच्या वक्तव्याचा निषेधन नोंदविण्यासाठी आम्ही लंगोट वाटप केल्याचे शाहू सेना कार्यकर्त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, पैलानानांना आम्ही लंगोट वाटू नये यासाठी पालकमंत्र्यांच्या बगलबच्च्यांनी आमच्यावर दबाव आणला होता. हा दबाव झुगारुन लावत आम्ही पैलनानांना लंगोट वाटले आणि या साडीवाटपाचा निशेष केला. शाहू सेनेचे बाजीराव साळोखे, पै. बाबा महाडिक व सहकाऱ्यांनी आपण पैलनानांना लंगोट वाटून कोथरुड येथील साडी वाटपाचा निषेध करणार असल्याचे पत्रक वाटून जाहीर केले होते. त्यानुसार शाहू सेना पदाधिकाऱ्यांनी कोल्हापूरात रविवारी (3 सप्टेंबर 2019) लंगोट वाटप केले. (हेही वाचा, पुण्यामध्ये 'चंपा साडी सेंटर'चे उद्घाटन करत राष्ट्रवादीने केले आंदोलन; पहा व्हिडीओ)
मोतीबाग तालीम व गंगावेश तालीम या ठिकाणी लंगोट वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला. या वेळी बाजीराव साळोखे यांच्यासह भिकशेठ रोकडे, आनंदा पाटील, संकेत साळोखे, धैर्यशील साळोखे, ऋतुराज पाटील, सिद्धेश डवरी, करण यादव उपस्थित होते. दरम्यान, शाहू सेना संस्थापक बाजीराव साळोखे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, विधानसभा निवडणुकीत तेल लावलेल्या पैलवानाचा विषय काढण्यात आलेला विषय तसेच, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात वाटलेल्या साडी वाटपाचा निशेष म्हणून आम्ही हे आंदोलन केले आहे. तसेच, पैलनानांचे आरोग्य आणि खुराक याकडेही सरकारचे दूर्लक्ष होत आहे. त्याकडेही सरकारचे लक्ष वेधण्याचा आमचा विचार होता, असे साळोखे यांनी सांगितले.
शाहू सेना सदस्य धैर्यशील साळोखे यांनी सांगितले की, लंगोट वाटप करण्यामध्ये आमची कोणतीही राजकीय भूमिका नव्हती. खरं असे असतानाही पालकमंत्र्यांच्या बगलबच्च्यांकडून आमच्यावर दडपशाही करण्याचा प्रयत्न झाला. परंतू, आम्ही ही दडपशाही न जुमानता पैलवानांना लंगोट वाटप केले आणि साडी वाटपाचा निषेध केला, असेही धैर्यशील साळोखे यांनी सांगितले.