Kolhapur Flood Update: कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीची पातळी वाढली; 98 बंधारे पाण्याखाली
कोल्हापूरच्या सकल भागात पाणी साचलं आहे. जिल्ह्यात पूराचीस्थिती पाहता 7006 नागरिकांचं सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आलं आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे पंचगंगा नदीची पातळी 47.5 फुटांवर पोहोचली आहे. तर जिल्ह्यातील अनेक नद्यांना पूर आला असून प्रमुख 25 राज्य मार्ग बंद आणि 123 मार्ग बंद बंद झाले आहेत. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. 98 बंधारे पाण्याखाली गेले असून राधानगरी धरणातून प्रति सेकंद 7212 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. अलमट्टी धरण हे कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यात आहे. या धरणातील पाणीसाठ्याच्या थेट परिणाम कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूरस्थितीवर होतो. (हेही वाचा - Shivneri Fort: शिवनेरी गडावर तटबंदीचा कडा कोसळला; जुन्नर वनविभागाकडून पर्यटकांना सतर्कतेचा इशारा)
पावसामुळे नद्यांचं पाणी नागरी वस्त्यांमध्ये शिरलं आहे. कोल्हापूरच्या सकल भागात पाणी साचलं आहे. जिल्ह्यात पूराचीस्थिती पाहता 7006 नागरिकांचं सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आलं आहे. तसेच 3237 जनावरांचंही स्थलांतर करण्यात आलं आहे. पावसामुळे नद्यांचं पाणी नागरी वस्त्यांमध्ये शिरलं आहे. कोल्हापूरच्या सकल भागात अनेक घरांमध्ये पाणी घुसला असून अनेक नागरिकांना स्थलांतर करण्यात आलेला आहे. कोल्हापूर-गारगोटी मार्ग सुद्धा मडिलगेत पाणी आल्याने बंद झाला आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याची वाहतूक यंत्रणा कोलमडली आहे.
पुणे बेंगलोर महामार्गाच्या दोन्ही बाजूला असणारे हॉटेल्स, मल्टीपर्पज हॉल, गॅरेज गेले पाण्याखाली गेले आहेत.महामार्गा नजीक पुराचं पाणी आलं आहे. सध्या पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे कोल्हापुरात महापुराचा धोका वाढला आहे. खबरदारी म्हणून प्रशासनाने सतर्कतेचे आदेश दिले आहेत.