Kolhapur Fire: कोल्हापुरात शाहू मिल परिसरात भीषण आग, घटनास्थळी अनेक फटाक्यांची दुकाने

कोल्हापुरात घराला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

कोल्हापुरातून आगीची मोठी अपडेट समोर आली आहे. कोल्हापुरात घराला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आगीच्या घटनेनंतर परिसरात एकच गर्दी झाली. कोल्हापुरात शाहू मिल परिसरातील घराला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. कोल्हापुरातील शाहू मिल परिसरात आग लागल्यानंतर परिसरात लोकांची एकच धावाधाव झाली. आग लागल्याची माहिती मिळताच चार अग्निबंब घटनास्थळी पोहोचले. अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. फटाक्यांमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या परिसरात अनेक फटाक्याची दुकाने आहेत. (हेही वाचा -  Bandra Fire: अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या राहत्या इमारतीला आग, कोणतीही जीवीतहानी नाही (Watch Video))

पाहा व्हिडिओ -

 

कोल्हापुरातील शाहू परिसरात घरांना लागलेल्या आगीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. या आगीच्या घटनेमुळे परिसरात एकच लोकांची गर्दी जमा झाली. घरांच्या बाजूला असलेल्या फटाक्यांची दुकाने असल्याने मोठा भडका उडण्याची भीती अनेक जण व्यक्त करत होते. मात्र, अग्निशमन दलाच्या जवानांकडून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरु होते.

भोपाळमध्ये मंत्रालयाच्या इमारतीला भीषण आग

दरम्यान आज मध्य प्रदेशामध्ये भोपाळच्या मंत्रालय इमारतीला भीषण आग लागली आहे. वल्लभ भवनाला आग लागली असून आगीचे लोळ, धुराचे ढग आजुबाजूला दिसत आहेत. सध्या अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आग  नेमकी कशामुळे लागली आहे हे अद्याप समजू शकलेले नाहीत.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif