Mumbai: मुंबई लोकल ट्रेनमध्ये महिलेचे चुंबन, एकास सश्रम कारावासासह 10 रुपयांचा दंड

महिला आणि तिचे मित्र साक्षीदार असल्याचे अहवालात म्हटले आहे. दोघांनीही साक्ष दिली होती. याशिवाय आणखी दोन जणांनीही साक्ष दिली. त्यावेळी महिलेने आवाज केला तेव्हा सहप्रवाशांनी आरोपीला मारहाण केल्याचे त्यांनी पाहिले होते.

Mumbai: मुंबई लोकल ट्रेनमध्ये महिलेचे चुंबन, एकास सश्रम कारावासासह 10 रुपयांचा दंड
Crime | (Photo Credits: Pixabay)

मुंबईतील एका व्यावसायिकाला न्यायालयाने एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. यासोबतच त्याच्यावर 10 हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. या 37 वर्षीय व्यक्तीने मुंबई लोकल ट्रेनमध्ये एका महिलेचे चुंबन (Kiss In Train) घेतले होते. ही घटना 2015 सालची आहे. आपण हे जाणूनबुजून केले नसल्याचा युक्तिवाद दोषी व्यावसायिकाने न्यायालयात केला. उलट शेजारी उभ्या असलेल्या व्यक्तीने त्याला ढकलले होते. त्यानंतर तो समोर बसलेल्या महिलेवर पडला आणि त्याच्या ओठांनी महिलेच्या गालाला स्पर्श केला. मात्र न्यायालयाने सर्व युक्तिवाद फेटाळून लावत त्याला शिक्षा सुनावली आहे. टाईम्स ऑफ इंडिया या इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट व्हीपी केदार यांनी 37 वर्षीय किरण होन्नावरला दोषी ठरवले आहे.

मॅजिस्ट्रेट म्हणाले की एफआयआरमध्ये असे दिसून आले आहे की ट्रेनमध्ये चढल्यानंतर आरोपी महिलेसमोर बसला आणि तिच्याकडे एकटक पाहत राहिला. ते म्हणाले, "महिलांमध्ये गैर-मौखिक संकेत जाणण्याची आणि समजून घेण्याची जन्मजात क्षमता असते, तसेच लहान तपशीलांकडे लक्ष असते." त्यामुळे महिलेने हे आरोप अजाणतेपणी केले आहेत, असे म्हणता येणार नाही.

उजव्या गालाचे घेतले चुंबन

महिला आणि तिचे मित्र साक्षीदार असल्याचे अहवालात म्हटले आहे. दोघांनीही साक्ष दिली होती. याशिवाय आणखी दोन जणांनीही साक्ष दिली. त्यावेळी महिलेने आवाज केला तेव्हा सहप्रवाशांनी आरोपीला मारहाण केल्याचे त्यांनी पाहिले होते. न्यायालयाने म्हटले, 'आरोपींनी महिलेच्या उजव्या गालाचे चुंबन घेतल्याचे प्रत्यक्ष, ठोस आणि सकारात्मक पुराव्यांवरून सिद्ध झाले आहे. (हे देखील वाचा: Rape: नवी मुंबईत अल्पवयीन मुलीवर बलात्कार, तरुणी 2 महिन्यांची गरोदर राहिल्यानंतर घटना उघडकीस)

एक वर्षाची सुनावली शिक्षा 

न्यायालयाने व्यावसायिकाला 10 हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. जर वसुली झाली तर महिलेला नुकसानभरपाई म्हणून 5 हजार रुपये द्यावे लागतील, असे न्यायालयाने सांगितले. या प्रकरणात कमाल शिक्षा पाच वर्षांची असली तरी न्यायालयाने केवळ एक वर्षाची शिक्षा सुनावली आहे. आरोपींविरुद्ध गुन्हेगारी इतिहासाचे कोणतेही पुरावे नाहीत, असे न्यायालयाने म्हटले आहे. त्याच्या कुटुंबात तो एकमेव कमावता आहे.

(The above story first appeared on LatestLY on Apr 03, 2022 01:30 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).