Shraddha Walkar Murder Case: श्रध्दा वालकर हत्याकांड प्रकरणात संशयितांचीचं नाही तर थेट महाराष्ट्र पोलिसांची होणार चौकशी, गृहमंत्री अमित शाहांचं वक्तव्य

पण त्यावर पोलिसांनी कुठलीही कारवाई केली नाही. या संबंधीत कारवाई का केली गेली नाही असा सवाल उपस्थित होत असतानाचं या प्रकरणी महाराष्ट्र पोलिसांची देखील चौकशी होणार असं सुचक वक्तव्य देशाचे गृहमंत्री अमित शाहांनी केलं आहे.

Amit Shah (Pic Credit - ANI)

देशभरात गाजत असलेल्या श्रध्दा वालकर प्रकरणावर (Shraddha Walkar Murder Case) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी पहिल्यांदाच भाष्य केलं आहे. देशभरातून श्रध्दा प्रकरणाची कसुन चौकशी व्हावी तसेच गुन्हेगारास कठोर शिक्षेची मागणी जोर पकडत आहे. राजकीय नेत्यांनी देखील हे प्रकरण फास्ट्र ट्रॅक (Fast Track) म्हणून चालवण्याची मागणी केली आहे. तोच संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी सुरु असताना देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी श्रध्दा वालकर प्रकरणातील संशयितांबरोबरचं महाराष्ट्र पोलिसांची (Maharashtra Police) देखील चौकशी केल्या जाईल असं वक्तव्य ऐका खासगी वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत केलं आहे. आता महाराष्ट्र पोलिसांची ही चौकशी कशासाठी तर श्रध्दाने दोन वर्षापूर्वीतचं म्हणजे मुंबईत (Mumbai) वास्तव्यास असतांनाचं अफताभ विरुध्द तक्रार करणार पत्र लिहलं होत. पण त्यावर पोलिसांनी कुठलीही कारवाई केली नाही. या संबंधीत कारवाई का केली गेली नाही असा सवाल उपस्थित होत असतानाचं या प्रकरणी महाराष्ट्र पोलिसांची देखील चौकशी होणार असं सुचक वक्तव्य देशाचे गृहमंत्री अमित शाहांनी (Home Minister Amit Shah) केलं आहे.

 

तरी काहीच दिवसापूर्वी चौकशी दरम्यान मृत श्रध्दा वालकर (Shraddha Walkar) हिने पोलिसांना लिहलेलं एक पत्र पुढे आलं होतं. ज्यात आफताब तिचे तुकडे करुन मारुन टाकेल अशी धमकी देत असल्याचं पत्रात नमूद होतं. पण त्या पत्रावर त्यावेळी कारवाई न झाल्याने श्रध्दाने अखेर दोन वर्षानंतर हकनाक आपला जीव गमावला. वेळीचं याप्रकरणी कारवाई केली असती तर कदाचित श्रध्दा जिवंत असती म्हणून या प्रकरणात आता महाराष्ट्र पोलिसांची (Maharashtra Police) देखील चौकशी होणार आहे. (हे ही वाचा:- Shraddha Walkar Murder Case: श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणी Delhi Police कडून CBI कडे प्रकरण वर्ग करण्याची याचिका कोर्टाने फेटाळली)

 

श्रध्दा वालकर प्रकरणात (Shraddha Walkar Murder Case) रोज धक्कादायक माहिती पुढे येत आहे. धक्कादायक खुलासे होत आहेत. तरी या प्रकरणाचा शेवट नेमका काय होणार, गुन्हेगारास शिक्षा कधी मिळणार, देशभरातील गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांना चाप कधी बसणार या अनुत्तरीत प्रशनांच्या उत्तराची वाट संपूर्ण भारत बघत आहे.