Navi Mumbai Crime: रक्षकचं झाला भक्षक! पोलिसाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग, नवी मुंबईतील पामबिचवर धक्कादायक प्रकार
खुद्द कायद्याच्या रक्षकानेचं एका विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याची माहिती पुढे येत आहे.
इतर शहरांच्या तुलनेत मुंबई हे महिला सुरक्षेच्या दृष्टीने सुरक्षित शहर मानल्या जातं. पहाटे उशीरा रात्री पर्यत मुली महिला सुरक्षित बाहेर पडू शकतात असं म्हणतात. पण नवी मुंबईच्या पामबिच परिसरातून एक धक्कादायक माहिती पुढे येत आहे. खुद्द कायद्याच्या रक्षकानेचं एका विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याची माहिती पुढे येत आहे. यापेक्षा अधिक धक्कादायक बाब म्हणजे पिडीतेने अत्याचार करणाऱ्या पोलिस कॉन्सटेबल विरुध्द तक्रार दाखल करण्यास गेली असता पोलिसांनी तक्रार नोंदवल्याची आपबीती पिडीतेने सांगितली आहे. तरी पिडीत आयआयटी पवईची विद्यार्थिनी असुन ती पहाटे तिच्या मित्रासोबत मॉर्निंग वॉकला आली होती. तेथे अचानक एक पोलिस कॉन्सटेबल आला आणि तुम्ही येथे एवढ्या सकाळी काय करता असे प्रश्न विचारु लागला.
दोघांचीही विचारपूस करताना दोघांना पोलिसाने काही चुकीचे प्रश्न देखील विचारले. यावेळी त्यांनी उत्तर देण्यास नकार दिल्यानंतर संबंधित पोलिसाने मुलीचा विनभंग केला असा आरोप, पीडित मुलीने आणि तिच्या मित्राने केला आहे. हा संपूर्ण प्रकार घडत असताना पामबिचवरुन जाणाऱ्या गाडी चालकास दिसला. त्या चालकाने गाडी थांबवत या तरुम तरुणीस आपल्या गाडीत बसवत थेट सानपाडा पोलिस स्टेशन गाठलं. पिडीत तरुणीने पोलिस कॉन्सटेबलची तक्रार केली असता पोलिसांनी तक्रार नोंदवून घेण्यास नकार दिला. (हे ही वाचा:- MBVV Police: महिलेसह चार मुलांची हत्या, प्रकरणाला 28 वर्षांनी फुटली वाचा, आरोपीला अटक)
या धक्कादायक प्रकारानंतर कॉलेज विद्यार्थ्यांनी त्यांचं कॉलेज आयआयटी पवई गाठून घडलेला संपूर्ण प्रकार कॉलेजच्या डीनला सांगितला. डीनने संबंधित प्रकरणाची तातडीने दखल घेत हा प्रकार पवई पोलिसांना कळवला. मुंबईच्या पवई पोलिस ठाण्यात पीडित मुलीची तक्रार नोंदवण्यात आली. पण हा प्रकार नवी मुंबईच्या हद्दीत घडला असल्याने ती तक्रार पुन्हा सानपाडा पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आली असुन आता सानपाडा पोलिस स्टेशन या प्रकाराची सखोल चौकशी करत आहेत.