Hingoli Accident: हिंगोलीत स्कूल बसला मोठा अपघात; 7 ते 8 विद्यार्थी गंभीर जखमी

ड्रायव्हर बदलल्यानेच अपघात झाल्याचा आरोप आता पालकांनी केला आहे.

Accident (PC - File Photo)

हिंगोलीत एका बस अपघाताची घटना घडली आहे. एका शाळकरी बसचा भीषण अपघात झाला असून या अपघातामध्ये 7 ते 8 विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. जखमी विद्यार्थ्यांना तातडीने जवळच्या शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. शहरातील वसमतमध्ये खाजगी शाळेच्या बसचा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये सात ते आठ चिमुकले गंभीर जखमी झालेत. अपघात झालेली व्हॅन युनिव्हर्सल इंग्लिश स्कूलची असल्याचं समजलं आहे.  (हेही वाचा - मुंबई लोकलच्या लेडीज कोच मध्ये सुरक्षा वाढणार; महिला प्रवाशांना थेट Train Manager शी बोलण्यासाठी मिळणार Talk-Back System)

नेहमी प्रमाणेच रोज सकाळी विद्यार्थ्यांना घरुन शाळेत घेऊन जाणाऱ्या बसचा हा अपघात झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. विद्यार्थ्यांना आणण्यासाठी गेलेल्या बसचा चालक हा मध्येच बदलण्यात आला होता. ड्रायव्हर बदलल्यानेच अपघात झाल्याचा आरोप आता पालकांनी केला आहे. या घटनेनंतर रुग्णालयामध्ये विद्यार्थ्यांच्या पालकांनी मोठी गर्दी केली होती. तसेच त्यांनी शाळा प्रशासनावर नाराजी देखील व्यक्त करण्यात आली.

दरम्यान प्रमुख मार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघाताच्या संख्येत वाढ होत आहे. याच खड्ड्यांमुळे एक रिक्षा रस्त्यावर पलटी झाली. या घटनेमध्ये ऑटोचालक गंभीरित्या जखमी झाला असून प्रशासनाने रस्ते दुरुस्तीकडे लक्ष द्यावं अशी मागणी केली आहे. या अगोदर देखील या रस्त्यावर अनेक वेळा छोटे-मोठे अपघात झाले आहेत.