IPL Auction 2025 Live

'गाव तिथे बिअर शॉप' म्हणत आपला प्रचार करणाऱ्या वनिता यांना मिळाली 'इतकी' मते

निवडणूक म्हंटलं की प्रचाराचे विविध मुद्दे आले, प्रचार सभा आल्या. परंतु, या निवडणुकीत विशेष ठरली होती ती चंद्रपूर येथील एका महिला उमेदवाराची प्रचाराची अनोखी स्टाईल.

Vanita Raut (Photo Credits: Facebook, File Image)

Maharashtra Assembly Election 2019 Results: महाराष्ट्रात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीचे निकाल काल जाहीर झाले आहेत. निवडणूक म्हंटलं की प्रचाराचे विविध मुद्दे आले, प्रचार सभा आल्या. परंतु, या निवडणुकीत विशेष ठरली होती ती चंद्रपूर येथील एका महिला उमेदवाराची प्रचाराची अनोखी स्टाईल.

चन्द्रपूर मधील चिमूर येथील एका महिला उमेदवाराने दारुला उघड समर्थन दिलं होतं. चिमूर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार वनिता राऊत यांनी त्यांच्या जाहीरनाम्यातून जाहीरनाम्यातून दारुला समर्थन दिले. ‘गाव तिथे बियर बार’ अशी घोषणा देत त्यांनी आपल्या प्रचाराचा बार उडवला होता.

ज्या जिल्ह्यात दारुबंदी आहे, त्याच जिल्ह्यात या उमेदवाराने दारुला उघड समर्थन दिलं होत. चिमूर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार वनिता राऊत यांनी थेट जाहीरनामा प्रकाशित करत दारुला समर्थन दिले. त्यांनी ‘गाव तिथे बियर बार’ अशी घोषणा देत प्रचाराचा बार उडवला होता.

आपल्या जाहीरनाम्यात नमूद केल्यानुसार बेरोजगार तरुणांना दारु विक्रीचे परवाने, गाव तिथं बिअर बार, दारिद्र्य रेषेखालील लोकांना सवलतीत दारु देणे अशी अनेक आश्वासने वनिता यांनी जनतेला दिली होती. त्यांच्या मुलाखतीचा एक व्हिडीओदेखील महाराष्ट्रभर सोशल मीडियाद्वारे तुफान फिरत होता.

वरळी मध्ये शिवसेनेची पोस्टरबाजी; आदित्य ठाकरे यांचे 'भावी मुख्यमंत्री' म्हणून अभिनंदन 

मात्र प्रत्यक्षात मतदानामध्ये मात्र जनतेने त्यांची साथ सोडली. वनिता यांना मिळालेली मते होती फक्त 286. तर त्या मतदारसांघातून विजयी झालेल्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला मिळाली आहेत 86,852 मते.