नाशिक शहरात हेल्मेटसक्तीसाठी आजपासून राबविली जाणार विशेष मोहीम
नाशिक शहरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणा-यांवर वचक बसविण्यासाठी आजपासून हेल्मेटसक्ती विषयी विशेष मोहीम राबवली जाणार आहे
नाशिक शहरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणा-यांवर वचक बसविण्यासाठी आजपासून हेल्मेटसक्ती विषयी विशेष मोहीम राबवली जाणार आहे. त्यासंदर्भात मागील आठवड्यात नाशिक पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी या निर्णयाची माहिती दिली होती. त्यानुसार 13 मे पासून म्हणजेच आजपासून नाशिक पोलिसांनी हेल्मेटसक्तीसह बेशिस्त दुचाकी आणि चारचाकी वाहनचालकांसाठी विसेष मोहीम हाती घेतली आहे.
नाशिक शहरामध्ये अपघातांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. त्यात एप्रिलपर्यंत अपघातांमध्ये आतापर्यंत 63 लोकांचा मृत्यू झाला तर 88 जण गंभीर जखमी झाले आहेत. ह्या अपघातांचे कारणे पाहिली असता, विना हेल्मेट गाडी चालवणे, सीटबेल्ट न लावणे, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे अशीच आहेत. त्यामुळे अशा बेशिस्त वाहनचालकांना ताळ्यावर आणण्यासाठी ही कारवाई करण्यात आली असल्याचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी सांगितले आहे.
पुण्यात हेल्मेटसक्ती जोरात; 'नो हेल्मेट’चा दंड तब्बल 18,500, 37 वेळा विनाहेल्मेट
तसेच वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणा-या दोषी वाहनचालकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करत त्याचा परवाना रद्द करण्यात येईल. त्यासंबंधी प्रादेशक परिवहन विभागाकडे प्रस्तावही पाठविण्यात आले असल्याचे नांगरे पाटील यांनी कबूल केले.