Maharashtra Monsoon Update: मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यात उद्या अति मुसळधार पावसाची शक्यता- आपत्ती व्यवस्थापन विभाग

त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Monsoon 2020 (Photo Credits: IANS)

महाराष्ट्रात गौरी विसर्जनादिवशी काहीशी विश्रांती घेतलेल्या पावसाने आज सकाळपासून मुंबई (Mumbai), ठाणे (Thane) जिल्ह्यात दमदार हजेरी लावली. आज सकाळपासूनच मुंबई, ठाणे, पालघर (Palghar), रायगड (Raigad) जिल्ह्यात पावसाची संततधार सुरुच आहे. त्यातच आता ठाणे जिल्ह्याच्या आपत्ती व्यवस्थापनाने (Disaster Management, Thane District) दिलेल्या माहितीनुसार, उद्या म्हणजेच 29 ऑगस्टला मुंबई, मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

मुंबईत आज सकाळपासून पावसाने चांगलाचा जोर धरला आहे. यामुळे भांडूप, विक्रोळी, दादर येथील अनेक सखल भागात पाणी साचले. यासोबतच महाराष्ट्रात पुढील 24 तासात विदर्भ, मराठवाडा आणि नॉर्थ कोकणात पावसाचा जोर वाढलेला दिसून येणार आहे. याबद्दल आयएमडी यांनी अधिक माहिती दिली आहे. BMC Withdraws Water Cut: मुंबईकरांवरील पाणीकपातीचं संकट पूर्ण टळलं; तलावांमध्ये 95% च्या पार पाणीसाठा

राज्यात जून ते 17 ऑगस्ट दरम्यान, 826.7 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. त्याचसोबत जून ते आतापर्यंत सामान्यपणाच्या स्वरुपापेक्षा 16 टक्के अधिक पावसाची नोंद करण्यात आली आहे. गेल्या वर्षात मॉन्सून मध्ये याच कालावधीत 713.7 मिमी पावसाची नोंद करण्यात आली होती. आयएमडी यांनी असे म्हटले होते की, राज्यातील 36 जिल्ह्यांमधील 1 जून नंतर पावसाचा जोर वाढल्याचे दिसून आले आहे. तर यवतमाळ, गोंदिया आणि अकोल्यात कमी पावसाची नोंद करण्यात आल आहे.