Vegetable Price Hike: मुसळधार पावसामुळे खिशाला कात्री! आलं आणि टोमॅटो सोबत ह्या भाज्या देखील विक्रमी किमतीला
सर्वसामान्यांच्या खिशाला परिणाम झालेला पाहायला मिळत आहे. आलं पेट्रोल पेक्षाही महागलं आहे.
Vegetable Price Hike: गेल्या आठवड्यापासून राज्यभरात चांगलाच पाऊस पडत आहे. मान्सून लांबणीमुळे शेतकऱ्यांच्या पीकाची नासाडी पाहायला मिळाली. आता तर चक्क भाजीपाल्याच्या किंमतींनी रडकुंडीला आणले आहे. मुसळधार पावसांमुळे पीकांचे नुकसान झाले आणि त्यामुळे बाजारात भाजीपाला चांगला महाग झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून टोमॅटो (Tomato Price Hike) किंमतीमुळे खिशावर परिणाम झाला. भंडारा जिल्ह्यात टोमॅटो हा पेट्रोलपेक्षाही महाग विकला जात आहे.
बाजारात कोणतीही भाज्यांच्या किंमती 50 रुपये प्रति किलोने विकला जात आहे. टोमॅटो हा 100 रु प्रति किलो विकला जात आहे तर आलं तर 320 प्रति रुपये किलोच्या भावाने विकला जात आहे. सतत च्या बदलत्या हवामानामुळे भाज्याच्या उत्पादनात 70 टक्के घट झाल्याचे दिसून आले. पाव किलो आलं 80 ते 100 रुपये किलो आहे. टोमॅटो सह भोपळा, भेंडी, कोबी, कारलं अनेक भाज्यांच्या किंमतीत वाढ झाली आहे.
कारल - 60 रुपये प्रति किलो, भेंडी - 60 रुपये प्रति किलो, घोसळी- 50 रुपये प्रति किलो, फ्लॉवर- 60 रुपये प्रति किलो, सोयाबीन -120 रुपये प्रति किलो, पडवळ-60 रुपये प्रति किलो, कारलं- 60 प्रति रुपये किलो आणि टोमॅटो - 100 रुपये प्रति किलो, आले - 320 रुपये प्रति किलो
बाजारात भाज्याच्या किंमती ऐकून सर्व सामान्य जनता आवाक झाली आहे. आता हे भाव किती दिवस राहतील ह्या कडे सर्व सामान्य जनतेचे लक्ष लागून आहेत.