Maharashtra Rains: विदर्भात पुन्हा मुसळधार, हवामान विभागाकडून विशेष सुचना जारी
राज्यातील विविध भागात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. प्रामुख्याने विदर्भातील अनेक जिल्ह्यात धोधो पाऊस कोसळत असल्याचं चित्र आहे.
आज राज्यातील नागरिकांमध्ये स्वातंत्र्यदिनाचा (Independence Day) मोठा उत्साह बघायला मिळत आहे. सकाळ पासूनच शहरात, गाव खेड्यात शासकीय खासगी जागी देखील ध्वजारोहणाचा (Flag Hosting) उत्साह बघायला मिळत आहे. पण राज्यातील विविध भागात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. प्रामुख्याने विदर्भातील (Vidarbha) अनेक जिल्ह्यात धोधो पाऊस (Heavy Rain) कोसळत असल्याचं चित्र आहे. हवामान विभागाकडून गोंदिया (Gondia) जिल्ह्यांला रेड अलर्ट (Red alert) तर वर्धा (Wardha) आणि भंडारा (Bhandara) या जिल्ह्यांना येलो अलर्ट (Yellow Alert) देण्यात आला आहे. संततधार पावसामुळे अनेक ठिकाणी पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. विशेषत: भंडारा आणि गोंदियात जोरदार पाऊस पडत आहे तरी सुरक्षिततेच्या पार्श्वभुमिवर प्रशासनाकडून नागरिकांना खबरदारीच्या सुचना देण्यात आल्या आहेत.
मुंबईसह (Mumbai) उपनगरात सकाळ पासून तुरळक पावसाने हजेरी लावली आहे. दक्षिण मुंबई (South Mumbai), पश्चिम मुंबई (West Mumbai), ठाणे (Thane), नवी मुंबई (Navi Mumbai) या भागात पावसाच्या तुरळक सरी बघायला मिळत आहे. तसेच पुणे (Pune) जिल्ह्यातील काही भागात पावसाने हजेरी लावली आहे. येदोन दिवस पुण्यात आणि आजूबाजूच्या परिसरातदेखील मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला आहे. पुण्यासह पिंपरी-चिंचवडमध्येही (Pimpri Chinchwad) जोरदार पावसानं लावली आहे. (हे ही वाचा:- Independence Day 2022: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी कोयना धरण परिसरात अनोखी रोषणाई)
विदर्भातील (Vidarbha) विविध जिल्ह्यांमध्ये पावसाची जोरदार बॅटींग बघायला मिळत आहे. अनेक गावांना पुराच्या पाण्यानं विळखा घातला असुन अप्पर वर्धा (Upper Wardha)- लोअर वर्धा (Lower Wardha) या सारख्या मोठ्या धरणांचे दरवाजे उघडण्यात आले आहे. विदर्भातील भंडारा (Bhandara), गोंदिया (Gondia), नागपूर (Nagpur) या जिल्ह्यांना पावसानं झोडपून काढलं आहे. शहरी भागात पावसाचा जोर कमी असला तरी ग्रामीण भागात मात्र जोरदार पावसामुळे मोठं नुकसान झालं आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)