Maharashtra Rain Updates: वादळी वारे, ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट, राज्यभर परतीच्या पावसाचा कहर; शेतीचं मोठं नुकसान

हवामान विभागाकडून मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे .पुढील 3,4 दिवस राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये हलक्या किंवा मध्यम गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Monsoon | Image Used For Representational purpose Only (Photo Credits: Pixabay.com)

दिवाळी तोंडावर येवूण ठेपली तरी राज्यतील विविध भागात पावसाचा धुमाकुळ बघायला मिळत आहे. अनेक भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावने हजेरी लावली आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं असुन कापुस, सोयाबिन यांसारखं पीक शेतात आडव झोपल्याचं चित्र बघायला मिळत आहे.मराठवाडा (Marathwada), कोकण (Konkan), पश्चिम महाराष्ट्र (western Maharashtra) यांभागात पावसाची दमदार बॅटींग बघायला मिळत आहे. एवढचं नाही तर परिसरातील नद्यांना पूर आला असुन नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पुणे (Pune), अहमदनगर, पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) या भागात काल संध्याकाळी जोरदार पाऊस पडला. तर मराठवाड्यातील परभणी (Parbhani), लातुर (Latur),हिंगोली (Hingoli) या भागातील तर तब्बल 152 गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

 

परतीच्या पावसानं शेती पिकांना मात्र, मोठा फटका बसला आहे. शेती पिकांचे नुकसान झाल्यानं शेतकरी संकटात सापडला आहे. सोयाबीन, कापूस, मूग, यासह भाजीपाला (Vegitables) द्राक्ष (Grapes) पिकांचे मोठं नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांच्या हाती आलेला घास या परतीच्या पावसानं हिरावून घेतला आहे. परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. पिकं पाण्याखाली गेल्यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा एकदा नुकसानीचा सामना करावा लागत आहे. (हे ही वाचा:- Mumbai: मुंबई ते ठाणे मुख्य रस्ता चार दिवस राहणार बंद, वाहतुकीवर होणार परिणाम)

 

हवामान विभागाकडून (IMD मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे .पुढील 3,4 दिवस राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये हलक्या किंवा मध्यम गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी संबंधीत काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.