Gondia Crime: महाराष्ट्र हादरला! एक नाही तर सलग दोनदा महिलेवर सामूहिक अत्याचार, पिडीतेची मृत्यूशी झुंज
घरी सोडण्याच्या बहाण्यानं जंगलात नेऊन 35 वर्षीय महिलेवर अमानुष अत्याचार.
गोंदिया (Gondia) जिल्ह्यात माणूसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. मदतीचं आश्वासन देऊन 35 वर्षीय महिलेवर सलग दोनदा बलात्काराची (Rape) घटना घडली आहे. एवढचं नाही तर दोनदा झालेल्या सामूहिक बलात्कार हा दोन वेगवेगळ्या नराधमांच्या टोळी कडून घडल्याची धक्कादायक बाब पूढे येत आहे. तरी या घटनेनंतर महिला खरचं सुरक्षित आहेत का असा प्रश्न आज पुन्हा निर्माण झाला आहे. यावर्षी आपण स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव साजरा करत आहोत तरी महिला सुरक्षेचा प्रश्न अजुनही देशात भेडसव आहे ही गंभीर बाब या गोंदियाच्या सामूहिक बलात्काराच्या (Gang Rape) घटनेनंतर पुढे आली आहे.
पिडीत महिला गोंदियातील जिल्ह्यातील गोरेगाव (Goregaon) तालुक्यातील कमरगाव या ठिकाणी आईकडे जाण्यासाठी निघाली. रस्त्यात भेटलेल्या अज्ञात आरोपीनं तिला घरी सोडण्याच्या बहाण्यानं कारमध्ये बसवलं. पण या नराधमानं पुढे तिला घरी सोडलं नाही, तर गोंदिया जिल्ह्याच्या मुंडीपार (Mundipar Forest) जंगलात नेऊन 30 जुलैला तिच्यावर अमानुष अत्याचार केले. हा नराधम एवढ्यावरच थांबला नाही, त्यानं दुसऱ्या दिवशीही म्हणजेच, 31 जुलैला पळसगाव जंगलात (Palsgaon Forest) नेऊन अत्याचार केला. त्यानंतर पीडितेला तिथेच सोडून आरोपीनं पळ काढला. पीडिता कशीबशी जंगलातून निघून धर्मा ढाब्यावर पोहोचली, तिथे तिने मदत मागितली दुचाकी दुरुस्त करणाऱ्या दोघांनी तिला घरी सोडण्यास होकार दिला पण घरी सोडण्याच्या बहाण्यानं त्या दोघांनीही पीडितेवर पाशवी अत्याचार केले. त्यानंतर पीडितेला कन्हाळ मोह गावाच्या पुलाजवळ विवस्त्र अवस्थेत सोडून दिले.
सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडीतेची अवस्था गंभीर आहे. रक्तस्त्राव थांबवण्यासाठी डॉक्टरांनी तिच्यावर शस्त्रक्रिया केली असून आणखी शस्त्रक्रिया कराव्या लागणार असल्याची माहिती आहे. मात्र तिची गंभीर अवस्था लक्षात घेत तिला नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात (Nagpur Medical) दाखल करण्यात आलं असून तिथेही तिची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. प्रचंड रक्तस्त्राव होत असल्यामुळं सुरुवातीला डॉक्टरांनी ते थांबवण्याचे प्रयत्न केले. नंतर आवश्यक असलेली कोलोस्टॉमी शस्त्रक्रिया (Operation) करण्यात आली. अजूनही काही शस्त्रक्रिया कराव्या लागणार असल्याची माहिती मिळत आहे.