गीतांजली एक्सप्रेसच्या डब्याला आग, प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण
जळगाव (Jalgaon) येथून हावडा (Howrah) कडे येणाऱ्या गीतांजली एक्सप्रेसच्या (Gitanjali Express) शेवटच्या डब्याला अचानकपणे आग लागली.
जळगाव (Jalgaon) येथून हावडा (Howrah) कडे येणाऱ्या गीतांजली एक्सप्रेसच्या (Gitanjali Express) शेवटच्या डब्याला अचानकपणे आग लागली. तर या घटनेत कोणतीही जीवतहानी झाली नसल्याचे सांगण्यात आले असून शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असल्याची माहिती देण्यात येत आहे.
सोमवारी (11मार्च) दुपारी 12.30 वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे. शिरसोली रेल्वे स्थानकाजवळून जात असताना गीतांजली एक्सप्रेसच्या डब्याला आग लागल्याचे गेटमनच्या लक्षात आले. तसेच प्रवाशांमध्ये आग लागल्याने भीतीचे वातावरण पाहायला मिळाले. त्यानुसार वरिष्ठांशी संपर्क साधत काही अंतराच्या हाकेवर एक्सप्रेस थांबवण्यात आली. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या पोहचल्या असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
एक्सप्रेसचा शेवटचा डबा जळाला असून कोणतेही नुकसान झाले नसल्याचे सांगितले जात आहे. तसेच यापूर्वीही रेल्वे रुळाला तडे गेल्याची गोष्ट वेळीच लक्षात आल्याने होणारी दुर्घटना टाळण्यात आली होती.
(The above story first appeared on LatestLY on Mar 11, 2019 02:29 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

