Ghatkopar Hording Collapse: घाटकोपर दुर्घटनास्थळी नेत्यांचं राजकारण; भाजप आणि मविआचे भावी खासदार भिडले(Watch Video)
ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Ghatkopar Hording Collapse: मुंबई (Mumbai) मध्ये काल झालेल्या पावसामुळे घाटकोपर(Ghatkopar) येथे मोठी दुर्घटना घडली. पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळून(Ghatkopar Hording Collapse)अनेकांचा मृत्यू झाला. या घटनेत १४ जणांचा मृत्यू झाला असून ७४ लोक जखमी झाले आहेत. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे मोठी जीवितहानी झाली. त्यामुळे सर्वत्र हळहळ अन् संताप व्यक्त होत आहे. घटनेला अवघे काही तास उलटत नाही तोच रोजकीय पक्षांचे नेते दुर्घटनास्थळी भेट देण्यासाठी हजेरी लावू लागले आहेत. विशेष म्हणजे भाजप (BJP)आणि महाविकास आघाडी(MVA)च्या लोकसभेच्या उमेदवारांमध्ये दुर्घटनास्थळी जुंपली. २० मे रोजी मुंबईत मतदान पार पडत आहे. त्या आधीच उमेदवार रस्त्यांवर भाडू लागल्याने मतदारांपुढे त्यांची वेगळीच प्रतिमा निर्माण होण्याची शक्यता आहे. (हेही वाचा:Ghatkopar Hoarding Collapse Accident: घाटकोपर येथे होर्डिंग कोसळल्याने झालेल्या दुर्घटनेतील मृतांचा आकडा 14 वर; 74 जणांचा वाचवण्यात यश)
दरम्यान, घाटकोपरमध्ये झालेल्या होर्डिंग दुर्घटनेनंतर घटनास्थळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दाखल झाले होते. त्यावेळी त्यांच्यासह राजकीय नेते होते. यात शिक्षणमंत्री दिपक केसरकर तसेच भाजप नेते होते. त्यावेळी मविआच्या स्थानिक नेत्यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली.
नेमकं काय घडलं?
ईशान्य मुंबई लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार संजय पाटील आणि महायुतीचे मिहिर कोटेचा यांच्यामध्ये जोरदार जुंपल्याचे पाहायला मिळाले. संजय दिना पाटील हे घटनास्थळी दाखल झाले होते. तितक्यात मिहीर कोटेचा हे देखील आमदार पराग शाह यांच्यासोबत घटनास्थळी पोहोचले.त्यावेळी संजय पाटील यांनी पराग शहा आणि मिहीर कोटेचा यांना घटनास्थळावर जाण्यापासून रोखले. घटनास्थळावर शो शायनिंग करण्यासाठी जाऊ नका अशी तिखट प्रतिक्रिया यावेळी संजय पाटील यांनी पराग शहा आणि मिहीर कोटेच्या यांच्यासाठी दिली. त्यावरून त्यांच्यात काही काळ शाब्दिक चकमक उडालेली दिसून आली.