Gas Supply Interrupted Due to Damaged Pipeline: पाइपलाइन खराब झाल्याने मुलुंड आणि ठाण्यातील कोपरी येथील गॅस पुरवठा विस्कळीत
आपल्या ग्राहकांना झालेल्या गैरसोयीबद्दल खेद व्यक्त करताना, MGL ने बाधित भागातील रहिवाशांना या काळात सहकार्य करण्याचे आणि संयम राखण्याचे आवाहन केले आहे.
Gas Supply Interrupted Due to Damaged Pipeline: महानगर गॅस लिमिटेड (MGL) पाईपलाईन खराब झाल्यामुळे मुलुंड पूर्व, मुलुंड पश्चिम आणि ठाण्याच्या काही भागांतील रहिवाशांना अनपेक्षितपणे गॅस पुरवठा खंडित झाला आहे. 7 सप्टेंबर, 2023 रोजी सकाळी 8:00 वाजता घडलेल्या या घटनेमुळे या प्रभावित क्षेत्रांना गॅस पुरवठा त्वरित थांबवण्यात आला आहे.
अधिकृत निवेदनात, MGL अधिकाऱ्यांनी पाइपलाइनच्या नुकसानीची पुष्टी केली आहे. तसेच ते या समस्येचे निराकरण करण्यासाठी काम करत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. दुपारी 4:00 च्या सुमारास गॅस सेवा पूर्ववत होईल असा त्यांचा अंदाज आहे. (हेही वाचा - Thane Water Cut: ठाण्यात 8 सप्टेंबरला काही भागात 24 तास पाणी कपात; जाणून घ्या कोणकोणत्या भागांचा समावेश)
आपल्या ग्राहकांना झालेल्या गैरसोयीबद्दल खेद व्यक्त करताना, MGL ने बाधित भागातील रहिवाशांना या काळात सहकार्य करण्याचे आणि संयम राखण्याचे आवाहन केले आहे. ज्या रहिवाशांना या विशिष्ट भागात गॅस सेवेत व्यत्यय येत आहे त्यांना गॅस गळती, गॅस थांबणे किंवा आगीच्या तक्रारींबाबत मदतीसाठी MGL च्या नवीन 24x7 आपत्कालीन सेवा क्रमांकांवर संपर्क साधण्याचा सल्ला दिला जातो.
दरम्यान, नागरिक आपत्कालीन क्रमांक 18002669944 (टोल-फ्री), (022)-68759400 आणि (022)-24012400 वर गॅस गळतीसंदर्भात वरील नंबरवर संपर्क करू शकतात.