आयएएस शुभम गुप्ता यांच्यावर ‘ॲट्रॉसिटी’ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी
शुभम गुप्ता यांच्यावर ‘ॲट्रॉसिटी’ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
गडचिरोलीत असल्याचे सिद्ध आहे. यानंतर आता गडचिरोलीतील आदिवासी संघटनांनी आक्रमक भूमिका घेत गुप्ता यांच्यावर अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करा, अशी मागणी केली आहे. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय भामरागड येथे 2021 ते 2023 या कार्यकाळात झालेल्या दुधाळ गाय वाटप घोटाळ्यात प्रकल्प अधिकारी शुभम गुप्ता हे दोषी असल्याचे आदिवासी विभागाच्या अपर आयुक्तांनी केलेल्या चौकशीत आढळून आले होते. (हेही वाचा - Badlapur School Student Abuse Incident: बदलापूरात चिमुकल्या मुलींवर अत्याचार प्रकरणी शाळा प्रशासनाकडून चौघांवर कारवाई; नागरिकांकडून शहर बंदची हाक)
या प्रकरणी 19 ऑगस्ट रोजी संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत कार्यालय परिसरात शुभम गुप्ता यांच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या. शुभम गुप्ता यांच्यावर ‘ॲट्रॉसिटी’ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद आणि पोलीस बॉईज असोसिएशनने मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले आहे.
गडचिरोली जिल्हा नक्षलग्रस्त, मागास आणि आदिवासीबहुल असल्याने येथील आदिवासींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन शेकडो कोटी रुपये खर्च करीत असते. मात्र, काही असंवेदनशील आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे शासनाच्या या प्रयत्नांना हरताळ फासल्या जात आहे. या प्रकरणाची अपर आयुक्तांनी चौकशी केल्यानंतर गुप्ता दोषी असल्याचे अहवालात नमूद केले आहे. सोबतच या अहवालात लाभार्थी आणि त्या कार्यालयातील अधिकाऱ्यांनी गुप्ता यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहे.