Nagpur Explosives Factory Blast: नागपूरमध्ये स्फोटके बनवणाऱ्या कारखान्यात झालेल्या स्फोटात 5 कामगारांचा मृत्यू, 5 जखमी

नागपूरमधील धामना गावाजवळ स्फोटके बनवणाऱ्या कारखान्यात स्फोट झाला. या घटनेत मृतांचा आकडा 5 वर गेला आहे. तर 5 जण जखमी आहेत. नागपूरमधील चारमुंडी कारखान्यात हा स्फोट झाला.

Photo Credit- X

Nagpur Explosives Factory Blast: नागपूरमध्ये स्फोटके बनवणाऱ्या कारखान्यात स्फोट झाला आहे. या घटनेत मृतांचा आकडा 5 वर गेला आहे. तर 5 जण जखमी आहेत. नागपूरमधील चारमुंडी कारखान्यात हा स्फोट झाला. स्फोट एकच्या सुमारास झाला. स्फोटाचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोलिस सध्या घटनेचा तपास करत आहेत. नागपूरमध्ये याआधीही स्फोटके बनवणाऱ्या कारखान्यात स्फोट झाला होता. दरम्यान, काल बुधवारी डोंबिवलीमध्ये एका कंपनीत स्फोट झाला होता. त्यानंतर आता नागपूरमध्ये देखील अशी घटना घडली आहे. (हेही वाचा:Dombivli MIDC Fire: डोंबिवली एमआयडीसी मध्ये महिन्याभरात दुसर्‍यांदा भीषण स्फोट झाल्याने आग (Watch Video))

पोस्ट पाहा-

धामना गावाजवळील स्फोटक कारखान्यात ही घटना घडली. सध्या कारखान्याचे व्यवस्थापक आणि मालक फरार आहेत.  स्फोटाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. तिथे आग विझवण्याचा प्रयत्न सुरु आहे. या दुर्घटनेनतंर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. स्फोटाची माहिती मिळताच कामगारांचे कुटुंबीय घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्यांची गर्दी पहायला मिळाली. माजी आमदार अनिल देशमुख घटनास्थळी दाखल झाले होते. परिसरात स्फोटांचे मोठे आवाज येउ लागल्याने काहीराळ तेथे भितीचे वातावरण निर्माण झाले होते.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now