मुंबई: WEH मेट्रो स्टेशनजवळील मेहता इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये आग; बचावकार्य सुरू

मीडिया रिपोर्ट्सनुसार, मेहता इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये (Mehta Industrial Estate) आग लागली असून अग्निशमन दलाच्या गाड्या तात्काळ रवाना करण्यात आल्या आहेत.

मुंबई: WEH मेट्रो स्टेशनजवळील मेहता इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये आग; बचावकार्य सुरू
Fire broke out in Mehta Industrial Estate (Photo Credits: Twitter)

मुंबईच्या चकाला- अंधेरी कुर्ला रोड (Chakala Andheri Kural Road) परिसरात वेस्टर्न एक्सप्रेस हायवे मेट्रो स्टेशनजवळ  (WEH Metro Station) आग लागल्याने भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, मेहता इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये (Mehta Industrial Estate) आग लागली असून अग्निशमन दलाच्या गाड्या तात्काळ रवाना करण्यात आल्या आहेत. आगीचं नेमकं कारण अद्याप समजू शकले नसले तरीही आगीवर नियंत्रण  मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

 आगीची दृश्य  

संध्याकाळच्या वेळेस अनेक चाकरमनी ऑफिस सुटल्यानंतर मेट्रोच्या मदतीने परतीचा प्रवास करत असतात. अशा ऐन मोक्याच्या वेळेस ही आग लागल्याने पश्चिम उपनगरात प्रवाशांची कोंडी होण्याची शक्यता आहे.

(The above story first appeared on LatestLY on Apr 16, 2019 06:35 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).