गोरेगाव येथे भर रस्त्यात ऑइल टँकरने घेतला पेट, वेस्टर्न एक्सप्रेस वे वर वाहतुकीचा खोळंबा

Fire Breaks Out In oil Tanker Cabin At Goregaon (Photo Credits: Twitter/ANI)

गोरेगाव (Goregaon) जवळील पश्चिम द्रुतगती मार्गावर (Western Express Way) भर रस्त्यात भारत पेट्रोलियम कंपनीच्या ऑइल टँकरच्या केबिनने पेट घेतल्याची घटना आज सकाळी घडली आहे. गोरेगाव पूर्वेकडून अंधेरीला निघाला असताना टँकरच्‍या टायरला तसेच केबिनला आग लागल्‍याची घटना घडली आहे. या टँकरला आग लागताच काही वेळातच अग्‍निशमन दलाची गाडी घटनास्‍थळी दाखल झाली.अग्‍निशमन दलास आग विझवण्‍यात यश आले असून, सुदैवाने यात कोणतेही जीवितहानी झालेली नाही. तसेच या आगीच्‍या घटनेमुळे गोरेगाव वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर वाहतुकीचा काहीवेळ खोळंबा झाला होता.

ANI ट्विट

अग्निशमन दलाने तातडीने मदतकार्य केल्यामुळे परिस्तिथी नियंत्रणाखाली आली आहे, याबाबत सविस्तर वृत्त अद्यापप हाती आलेले नाही.