Bhiwandi Fire: भिवंडी येथील काल्हेर परिसरातील इमारतीला भीषण आग; अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना
भिवंडी येथील काऱ्हेर परिसरातील एका इमारतीला आग लागली असून त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
भिवंडी (Bhiwandi) येथील काल्हेर (Kalher) परिसरातील एका इमारतीला आग लागली असून त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. आगीमुळे धुराचे लोळ सर्वत्र पसरले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अग्निशामक दलाच्या (Fire Brigade) गाड्या घटनास्थळी पोहचल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.
ANI ट्विट:
आगीचे कारण स्पष्ट झालेले नसून या आगीत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त अद्याप समोर आलेले नाही.