Satara Thoseghar Waterfall: साताऱ्यात ठोसेघर धबधब्याकडे जाणारा रस्ता खचला; पर्यटकांचा जीव धोक्यात घालून प्रवास

त्यात पावसाचा जोर घाटमाथ्यावर प्रचंड असल्याने ठोसेघर धबधब्याकडे जाणारा रस्ता खचल्याचे चित्र आहे.

Photo Credit- X

Satara Thoseghar Waterfall: गेल्या दोन दिवसांपूर्वी सातारा जिल्ह्याला रेड अलर्ट होता. परिणामी जिल्हात अतिमुसळधार पाऊस झाला. साताऱ्यातील अने नद्या-नाले तुडूंब भरून वाहत होते. आता ठोसेघर धबधब्याकडे (Toseghar Waterfall)जाणारा घाटरस्ता खचल्याचे समोर आले आहे. बोरणे गावाजवळ रस्ता खटल्याची घटना घडली. खूप मोठ्या प्रमाणात हा रस्ता खचला. त्यामुळे हा घाटरस्ता वाहतूकीसाठी धोकादायक बनला आहे. मात्र तरीही या रसत्यावर वाहनांची ये-जा सुरु आहे. पावसामुळे मोठ्या प्रमाणावर या घाट रस्त्यावर अनेक ठिकाणी दरडी कोसळल्याची घटना घडली आहे. डोंगरावरून मोठे दगड रस्त्यावर आल्याने काही काळासाठी वाहतूक ठप्प होत आहे. (हेही वाचा:Shivneri Fort: शिवनेरी गडावर तटबंदीचा कडा कोसळला; जुन्नर वनविभागाकडून पर्यटकांना सतर्कतेचा इशारा)

जवळपास 1500 फुटावरून ठोसेघर धबधबा कोसळतो. धबधबा पाहण्यासाठी, वाहत्या पाण्याचा आनंद घेण्यासाठी राज्यभरातून पर्यटक मोठ्या संख्येने तेथे हजेरी लावतात. सातारा जिल्ह्याला अजूनही रेड अलर्ट देण्यात आला आहे. जिल्ह्यातील पश्चिम भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने कोयना, कण्हेर धरणानांमधून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. कण्हेर धरणातून 5 हजार क्युसेकने कृष्णा नदीत विसर्ग सुरू आहे. त्यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.(हेही वाचा: Kolhapur Flood Update: कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीची पातळी वाढली; 98 बंधारे पाण्याखाली)

साता-याच्या महाबळेश्वरमधील तापोळा-देवळी रोडवर पुलाला अचानक भला मोठा खड्डा पडल्याने, कार खड्ड्यात अडकली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. जेसीबीच्या सहाय्यानं, या खड्ड्यात अडकलेल्या कारला बाहेर काढण्यात आले.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif