Jalyukta Shivar Yojana: जलयुक्त शिवार 2.0 योजनेला गती मिळणार; मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती

याप्रसंगी राज्यात नैसर्गिक शेती करण्यासंदर्भात व्यक्ती विकास केंद्रासमवेत कृषी विभागाने देखील सामंजस्य करार केला.

राज्यात जलयुक्त शिवार 2.0 अभियानाला गती मिळणार आहे. यासाठी राज्यात जलयुक्त शिवार लोकचळवळ बनवून मिशन मोडवर राबविणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. जलयुक्त शिवारच्या दुसऱ्या टप्प्यास गती देण्याकरिता राज्य शासनातर्फे आज व्यक्ती विकास केंद्र-आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेसमवेत सामंजस्य करार देखील करण्यात आल्याची माहिती ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. ताज येथे झालेल्या एका कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, श्री श्री रवीशंकर उपस्थित होते. याप्रसंगी राज्यात नैसर्गिक शेती करण्यासंदर्भात व्यक्ती विकास केंद्रासमवेत कृषी विभागाने देखील सामंजस्य करार केला.  (हेही वाचा - Dhangar Reservation Row: धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरून गोपीचंद पडळकर यांचे देवेंद्र फडणवीस यांना पत्र; असंवेदनशीलतेने प्रकरण हाताळणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांवर केली कारवाईची मागणी)

जलयुक्त शिवार २ मध्ये गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवारच्या कामासाठी मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने सामंजस्य करारावर सचिव सुनील चव्हाण आणि व्यक्ती विकास केंद्र-आर्ट ऑफ लिव्हिंग संस्था केंद्राचे अध्यक्ष प्रसन्न प्रभू यांनी स्वाक्षरी केली. राज्य सरकारच्या कृषी विभागाशी झालेल्या करारानुसार राज्यात व्यक्ती विकास केंद्र हे सेंद्रिय आणि नैसर्गिक शेती पिकविणे, मनुष्यबळ विकास, शेतकऱ्यांचे प्रशिक्षण, सध्याची रसायने आणि खतांवर आधारित पारंपरिक शेती नैसर्गिक शेतीमध्ये बदलणे ही कामे कृषी विभागाशी समन्वयाने करेल.