Potholes on Pusad Roads: पावसामुळे रस्त्यांवर खड्डेच खड्डे, जीव मुठीत धरून करावा लागतोय प्रवास; पुसद नगरापालिकेवर टीका (Watch Video)
त्यात वाशिम जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील रस्त्याची दुरावस्था पाहायला मिळत आहे. अनेक रस्त्यांवर मोठमोठे खड्डे (Potholes) पडले आहे.
Potholes on Pusad Roads: राज्यभरात पावसाने थैमान घातले आहे. त्यात यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील रस्त्याची दुरावस्था पाहायला मिळत आहे. अनेक रस्त्यांवर मोठमोठे खड्डे (Potholes) पडले आहे. याकडे नगरपालिका दुर्लक्ष करत असल्याचे चित्र दिसत आहे. रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांतून नागरिकांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. सततच्या पावसामुळे पुसद (Pusad) तालुक्यातील रस्त्यांवर खड्डे पडले आहे. या खड्ड्यांमुळे वाहकधारकांना, नागरिकांना आणि पादचाऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. (हेही वाचा- मुंबईत लवकरच खड्डे मुक्त रस्ते! पालिका वापरणार भन्नाट आयडिया)
मिळालेल्या माहितीनुसार, पुसद तालुक्यात असलेल्या खड्ड्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओतून पुसद नगरापालिकेवर टीका करण्यात आली आहे. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, दोन गावांना जोडणाऱ्या रस्त्यांवर हे मोठमोठे खड्डे दिसत आहे. पावसाच्या पाण्यामुळे खड्ड्यामध्ये पाणी साचले आहे. त्यामुळे खड्डा किती मोठा आहे याचा अंदाज घेऊ शकत नाही. या खड्ड्यांमुळे अपघात होण्याची शक्यता दिसून येत आहे. खड्ड्यांमुळे नागरिक संतापले आहे. त्यामुळे ही बाब लक्ष्यात घेतात प्रशासनाकडे रस्ता खड्डेमुक्त करावा अशी मागणी केली आहे.
पाहा व्हिडिओ
हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर @pusadkar_adi या अंकाऊटवरून पोस्ट केला आहे. या व्हिडिओवर अनेक नेटकऱ्यांनी कंमेट केले आहे. या व्हिडिओच्या मार्फत त्यांनी नगरपालिकेवर टीका केली आहे. नगरपालिकेने याकडे लक्ष द्यावे याकरीता हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी पुसद तालुक्यातील भोजला येथे एका तरुणाने साचलेल्या पाण्यात झोपून अनोखे आंदोलन केले होते.