Lockdown: कौटुंबिक हिंसाचार करणं ही कौतुकाची किंवा मर्दानगीची गोष्ट नाही - सुप्रिया सुळे
मात्र, या लॉकडाऊन काळात कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. कौटुंबिक हिंसाचार करणं ही कौतुकाची किंवा मर्दानगीची गोष्ट नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळेंनी सुनावलं आहे. स्वत: च्या कुटुंबाचं संरक्षण करणं ही प्रत्येक पुरुषाची नैतिक जबाबदारी असते.
कोरोना व्हायरसचा (Coronavirus) प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन (Lockdown) पाळण्यात घेत आहे. मात्र, या लॉकडाऊन काळात कौटुंबिक हिंसाचाराच्या (Domestic Violence) घटना घडत आहेत. कौटुंबिक हिंसाचार करणं ही कौतुकाची किंवा मर्दानगीची गोष्ट नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) सुनावलं आहे. स्वत: च्या कुटुंबाचं संरक्षण करणं ही प्रत्येक पुरुषाची नैतिक जबाबदारी असते.
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्त्रियांचा आदर करण्याचा संस्कार आपल्या दिला आहे. हा संस्कार आपण लक्षात ठेवला पाहिजे, असं मत सुप्रिया सुळेंनी व्यक्त केलं आहे. सुप्रिया सुळेंनी आज फेसबुकवरून संवाद साधला. यावेळी त्यांनी 'कौटुंबिक हिंसा आणि महिलांची सुरक्षितता' या विषयावर भाष्य केलं. (हेही वाचा - महाराष्ट्र: लॉकडाउनमुळे सिंधुदुर्ग येथे अडकलेल्या परप्रांतीयांची फिटनेस सर्टिफिकेट घेण्यासाठी रुग्णालयात गर्दी)
COVID-19 : ३ वर्षाची कोरोना पॉजेटिव्ह मुलगी देतेय इतर रुग्णांना जगण्याची प्रेरणा ; पाहा व्हिडिओ - Watch Video
दरम्यान, सुप्रिया सुळे यांनी नागरिकांना महिलांचा सन्मान करण्याचं आवाहन केलं आहे. स्त्रियांना सन्मान द्या, त्यांचा मान ठेवा, कौतुक करा, स्त्रियांना प्रेम करा, आदर करा, असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. कौटुंबिक हिंसाचार हा संवेदनशील विषय आहे. कौटुंबिक हिंसाचारावर मात कशी करायची यावर मी पर्याय सांगितला नाही. मात्र, आम्ही सगळे तुमच्यासोबत आहोत, असंही सुप्रिया सुळेंनी सांगितलं आहे.