Dombivli Crime: शुल्लक कारणावरुन वाद शिगेला! अंगावर थुकला म्हणुन दोघातील हाणामारी दरम्यान एकाचा मृत्यू

अंगावर थुकला म्हणुन दोघातील हाणामारी दरम्यान एकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना डोंबिवलीत घडली आहे.

Dombivli Crime: शुल्लक कारणावरुन वाद शिगेला! अंगावर थुकला म्हणुन दोघातील हाणामारी दरम्यान एकाचा मृत्यू
Murder | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

हल्ली कधी कुठल्या कारणावरुन वाद होईल ह्याचा काही नेम नाही. कैफ खान रस्त्यावरुन चालत असताना रस्त्यावर थुकला तोच मागुन दुचाकीवरुन येणाऱ्या विजय पाटवा नावाच्या अंगावर ही थुंकी पडली. दुचाकीस्वार विजयने गाडी थांबवत अंगावर का थुकलास असा सवाल विचाराला, तोच कैफ आणि विजयमध्ये शाब्दिक बाचाबाचीला सुरुवात झाली. काहीचं क्षणात कैफ विजयच्या अंगावर आला  आणि दोगांमध्ये हाणामारी सुरु झाली. दरम्यान आजुबाजूच्या नागरिकांनी बघ्याची भुमिका घेतली तरी कैफने विजयला गंभीर हाणामारी केली. तरी या मारामारीत विजय खाली कोसळला आणि त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तरी या मारामारीत विजय बेशुध्द झाला. यानंतर विजयला जवळच्या इस्पितळात दाखल केले असता डोक्यावर मार लागल्याने विजयला मृत घोषित केले. तरी विजय आणि कैफच्या या मारामारीचा व्हिडीओ सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे.

 

याप्रकरणी विष्णू नगर पोलीस ठाण्यात कैफ खान विरोधात गुन्हा दाखल झाला असून त्याला अटक करण्यात आली आहे. या मारामारीत विजय पाटवा यांचा मृत्यू झाल्याने कैफ विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली आहे. कैफ याला आज न्यायालयात हजर केले असता कल्याण न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तरी पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करीत आहेत. (हे ही वाचा:- Mumbai Shocker: खार परिसरामध्ये 17 वर्षीय मुलीवर 'Intimate Photo' प्रसिद्ध करेन या धमकीखाली समवयस्कर मुलाकडून अनेकदा बलात्कार; आरोपी अटकेत)

 

शुल्लक प्रकरणावरुन झालेल्या या हत्येमुळे डोंबिवलीत या प्रकरणामुळे खळबळ माजली आहे. डोंबिवलीतील गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. तरी पोलिस विभागाकडून या गुन्हेगारी प्रवृत्तीस आळा बसवण्याचे उपाय केले जात आहे. कैफ खान ह्याच्यावर कडक पोलिस कारवाई सुरु असुन विजय पाटवाच्या कुटुंबियांनी गुन्हेगार कैफला कठोर शिक्षा करण्यची मागणी केली आहे.

(The above story first appeared on LatestLY on Dec 11, 2022 06:14 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).