Fact Check: लोअर परळ च्या Phoenix Mall जवळील मुंंबई मेट्रो लाईन कोसळली? पहा या व्हायरल फोटोमागील सत्य
मात्र हे फोटो मुंंबईतील नसुन गुरुग्राम (Gurugram) मधील 22 ऑगस्ट रोजी कोसळलेल्या निर्माणाधीन पुलाचे आहेत
मुंंबईच्या लोअर परळ (Lower Parel) भागातील Phoenix मॉल जवळ सुरु असणार्या मुंंबई मेट्रो लाईन (Mumbai Metro Line) चा पुल कोसळुन पडल्याचा दावा करणारे काही फोटो सध्या Whatsapp सहित सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मात्र हे फोटो मुंंबईतील नसुन गुरुग्राम (Gurugram) मधील 22 ऑगस्ट रोजी कोसळलेल्या निर्माणाधीन पुलाचे आहेत अशी माहिती समोर येत आहे. एमएमआरडीएचे सह मेट्रोपॉलिटन आयुक्त, डॉ. बापू गोपीनाथराव पवार (Dr. Bapu Gopinathrao Pawar) यांनी दिलेल्या माहितीनुसार "कोणत्याही मेट्रो साइटवर अशी कोणतीही घटना घडली नाही. दक्षिण मुंबईत एमएमआरडीए (MMRDA) कोणतेही मेट्रोचे काम घेत नाही. व्हायरल संदेशात ही घटना फोनिक्स मॉलच्या जवळ असल्याचे सांगितले आहे मात्र हे मुळ फोटो गुरुग्राम मधील आहेत".
प्राप्त माहितीनुसार, शनिवारी रात्री गुरूग्रामच्या सोहना रोडवर बांधकाम सुरू असलेल्या उड्डाणपुलाचा काँक्रीटचा स्लॅब कोसळला होता, या घटनेने दोन जण जखम सुद्धा झाले होते, यासंदर्भात पोलिसांनी पीटीआय कडे माहिती सुद्धा दिली होती तसेच, हरियाणाचे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांनी सुद्धा शनिवारीच, यासंदर्भात माहिती देणारे ट्विट केले होते.
व्हायरल पोस्ट
पहा ओरिजनल दुर्घटनेचे फोटो
दरम्यान, अशा प्रकारे फोल दावे करणार्या अनेक पोस्टस सोशल मीडियावर दर दिवशी व्हायरल होत असतात त्यामुळे निदान अपघात किंंवा दुर्घटनांंच्या बाबर तरी अधिकृत माहितीशिवाय चुकीचे फोटोज व पोस्ट शेअर केले जाणार नाहीत याची सर्वांनी काळजी घेणे अपेक्षित आहे.